शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

बँकांनी ग्राहकांना सोडले वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST

सध्या बँकेत शेतकरी व ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. त्यात बँकेचे मुख्य प्रवेशद्वार बंद राहते. कोणताही कर्मचारी बाहेर राहात नाही. बँकेसमोर लाकडी बॅरीगेटस लावण्यात आले. तेथेच ग्राहकांना उभे राहण्यास सांगितले जाते. मात्र पार्किंग व बॅरीगेटसमधून जाण्याचा मार्ग एकच असल्याने गोंधळ उडतो. बँकेत टॉयलेटला सतत कुलूप असते.

ठळक मुद्देआर्णी तालुका : पाणीही नाही, जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेला केराची टोपली

लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेने ग्राहकांना वाºयावर सोडले आहे. बँकेत ग्राहक व शेतकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. ग्राहकांना उभे राहण्यासाठी धड जागाही नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे.सध्या बँकेत शेतकरी व ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे. त्यात बँकेचे मुख्य प्रवेशद्वार बंद राहते. कोणताही कर्मचारी बाहेर राहात नाही. बँकेसमोर लाकडी बॅरीगेटस लावण्यात आले. तेथेच ग्राहकांना उभे राहण्यास सांगितले जाते. मात्र पार्किंग व बॅरीगेटसमधून जाण्याचा मार्ग एकच असल्याने गोंधळ उडतो. बँकेत टॉयलेटला सतत कुलूप असते. ग्राहकांना हात धुण्यास पाणी नाही. सॅनिटायझरची व्यवस्था नाही. अनेक ग्राहक व शेतकरी बँकेबाहेर तासन्तास उन्हातान्हात ताटकळत राहतात.या शाखेत नेहमी शेतकरी व ग्राहकांची गर्दी होते. याबाबत अनेकांनी जिल्हाधिकाऱ्यांना माहिती दिली. जिल्हाधिकाऱ्यांनी सोशल डिस्टन्सिंग, हात धुण्यास पाणी, पिण्याचे पाणी, सॅनिटायझर, उन्हापासून बचावासाठी नेट आदींची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. मात्र बँकेने या सूचनांना केराची टोपली दाखविली आहे. अधिकारी उपाययोजनांकडे दुर्लक्ष करीत आहे. यामुळे वरिष्ठांनी भेट देवून दंडीत करावे, अशी मागणी होत आहे.सध्या खरीप हंगामासाठी शेतकरी बँकेत गर्दी करीत आहे. पीककर्ज लवकर मिळावे, अशी अपेक्षा आहे.ग्राहकांच्या तुलनेत जागा अपुरी आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग पाळले जात नाही. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.- योगीता आडेशाखा व्यवस्थापक, जिल्हा बँकचारही बँकांमध्ये पाण्याची सुविधा नाहीयेथील शिवनेरी चौकात विविध चार बँका आहे. मात्र कुठेही पिण्याच्या पाण्याची पुरेशी व्यवस्था नाही. गेली दोन महिने तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष अतुल देशमुख यांनी मोफत पाण्याची व्यवस्था केली होती. आता मात्र कुठेही पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. जिल्हाधिकाºयांनी या गंभीर प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी शेतकरी व ग्राहकांकडून होत आहे.

टॅग्स :bankबँक