शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

बँंक निवडणुकीला सप्टेंबर उजाडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST

जिल्हा बँकेच्या २१ संचालक पदासाठी निवडणूक घोषित झाली. त्यापैकी पुसद व उमरखेडचे संचालक बिनविरोध झाले. उर्वरित १९ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. मतदानाला दोन दिवस शिल्लक असताना लॉकडाऊनमुळे ही निवडणूक लांबणीवर पडली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली तीन महिन्याची मुदत संपली आहे. प्रत्यक्षात त्यावरून पाच महिने लोटले आहे. आता निवडणूक नेमकी केव्हा होणार याबाबत संभ्रमावस्था आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांची सशर्त शिफारस : चेंडू सहकार प्राधिकरणाच्या कोर्टात

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा बँक संचालक पदाच्या निवडणुकीत जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रातील अनेक दिग्गज भवितव्य आजमावित आहे. त्यांना मतदान केव्हा होते याचे वेध लागले आहे. परंतु या मतदानासाठी किमान सप्टेंबर महिना उजाडण्याचा अंदाज सहकार क्षेत्रात वर्तविला जात आहे.जिल्हा बँकेच्या २१ संचालक पदासाठी निवडणूक घोषित झाली. त्यापैकी पुसद व उमरखेडचे संचालक बिनविरोध झाले. उर्वरित १९ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. मतदानाला दोन दिवस शिल्लक असताना लॉकडाऊनमुळे ही निवडणूक लांबणीवर पडली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली तीन महिन्याची मुदत संपली आहे. प्रत्यक्षात त्यावरून पाच महिने लोटले आहे. आता निवडणूक नेमकी केव्हा होणार याबाबत संभ्रमावस्था आहे.महाराष्टÑ राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण पुणे यांनी यवतमाळच्या जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून बँकेची निवडणूक घेता येईल का अशी विचारणा १२ जून रोजी केली होती. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी २ जुलै रोजी रोजी प्राधिकरणाला पत्र पाठवून सशर्त निवडणूक घेण्यास ग्रीन सिग्नल दिला होता. मात्र ही निवडणूक घेत असताना कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करण्याची अट जिल्हाधिकाºयांनी घातली होती. याच पत्रात जिल्हा उपनिबंधकांचा हवाला देण्यात आला आहे. त्यात उपनिबंधकांनी सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकीला मौखिक स्थगनादेश दिल्याचे म्हटले आहे. वास्तविक ही बाब जिल्हाधिकाºयांनी उपनिबंधकांना लेखी स्वरूपात मागितली होती. तेव्हा आपल्याला हे सरकारी वकिलांनी सांगितल्याचे उपनिबंधकांनी म्हटले.उपनिबंधकांच्या या वक्तव्याची खातरजमा करण्यासाठी सहकार निवडणूक प्राधिकरणाने अमरावतीच्या विभागीय सहनिबंधकांना याबाबत लेखी मागितले. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक स्थगितीबाबत असा कोणताही आदेश जारी केला नसल्याचे सहनिबंधकांनी कळविल्याची माहिती आहे. एकूणच प्रशासनाकडून जिल्हा बँक निवडणुकीसाठी मतदान घेण्यास सशर्त ग्रीन सिग्नल मिळाला आहे. निवडणूक नेमकी केव्हा घ्यायची याबाबत प्राधिकरण विचार करीत आहे. केंद्र सरकार ३१ जुलैनंतर लॉकडाऊन वाढविण्याची शक्यता नाही. हा लॉकडाऊन न वाढल्यास ऑगस्टमध्ये निवडणूक घेतली जाऊ शकते. लॉकडाऊन वाढल्यास सप्टेंबर उजाडू शकतो. कारण सहकारातील सर्व निवडणुकांना राज्य शासनाने सहा महिने मुदतवाढ दिली होती. ही मुदत सप्टेंबरमध्ये संपणार आहे. पुन्हा मुदतवाढ मिळण्याची शक्यता नाही. त्यामुळे सप्टेंबरमध्ये निवडणूक घेतली जाण्याची दाट शक्यता जिल्ह्याच्या सहकार क्षेत्रात वर्तविली जात आहे.तर सर्वोच्च न्यायालयाचे दार ठोठावणारसप्टेंबरनंतरही जिल्हा बँक संचालक पदासाठी मतदान घेतले न गेल्यास थेट सर्वोच्च न्यायालयात जाण्याची तयारी संचालक तथा उमेदवारांनी केली आहे. न्यायालयाने तीन महिन्याची मुदत दिली होती. मात्र पाच महिने होऊनही मतदान घेतले गेले नाही, असा मुद्दा उपस्थित करून न्यायालयाच्या अवमानाकडे लक्ष वेधले जाणार आहे. बँकेचे जे विद्यमान संचालक आहेत, परंतु निवडणूक रिंगणात नाहीत, त्यांची नाराजी होऊ नये म्हणून सध्या न्यायालयात जाणे टाळले जात असल्याचे सांगितले जाते. गेल्या १३ वर्षांपासून बँकेवर संचालक असलेल्या या काही (सध्या रिंगणात नसलेल्या) मंडळींना मुदतवाढीची ही स्थिती पुढेही कायम रहावी अशी सुप्त इच्छा आहे.निवडणुकीबाबत आत्ताच काही सांगता येत नाही. सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. त्यावरील निर्णयानंतरच पुढे काही करता येईल.- यशवंत गिरी, सचिव,महाराष्ट्र राज्य सहकार प्राधिकरण.

टॅग्स :bankबँक