शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

पीओपींच्या गणेशमूर्ती स्थापनेवर बंदी घाला

By admin | Updated: August 24, 2014 00:15 IST

महामानवांच्या जीवनचरित्रातून समाजाला सदैव मार्गदर्शन व प्रेरणा मिळत असते. महापरुष हे समाज व राष्ट्रासाठी आदर्श असतात. परंतु अलिकडच्या काळात महामानवांच्या विटंबनांचे प्रकार वाढले

पुसद : महामानवांच्या जीवनचरित्रातून समाजाला सदैव मार्गदर्शन व प्रेरणा मिळत असते. महापरुष हे समाज व राष्ट्रासाठी आदर्श असतात. परंतु अलिकडच्या काळात महामानवांच्या विटंबनांचे प्रकार वाढले ते थांबविण्याचा एक प्रकार म्हणून महामानवांच्या प्रतिमांचा कोठेही वापर होऊ नये तसेच पर्यावरणाचा धोका म्हणून पीओपीच्या गणेशमूर्तीसुद्धा बसविण्यात येवू नये, अशी मागणी मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेडच्यावतीने करण्यात आली आहे. या संदर्भात पुसदचे उपविभागीय अधिकारी चंद्रकांत जाजू व शहरचे ठाणेदार रमेश सोनुने यांना संघटनांकडून निवेदन देण्यात आले.निवेदनात पुढे म्हटले आहे की, येत्या २९ आॅगस्टपासून गणेशोत्सवाला प्रारंभ होणार असून यामध्ये महापुरुषांच्या रूपातील विडंबनात्मक सजावट करण्यात येवू नये. कारण गणेशमूर्तीचे दहा दिवसानंतर पाण्यात विसर्जन करण्यात येते. मात्र महामानवांचे पाण्यात विसर्जन करीत नसतात. तसेच पीओपीपासून तयार केलेल्या मूर्त्या पाण्यात विरघळत नाहीत, असे सुद्धा निवेदनात म्हटले आहे.तर सदर मूर्ती पाण्यात वाहत जावून मूर्तीची विटंबना होवून भावना दुखावल्या जावू शकतात. या संदर्भात शहरातील मूर्तीकारांना व गणेश मंडळांना सूचना देण्यात याव्या व सूचना देवूनही तसा प्रयत्न झाल्यास मूर्तीकारांवर कठोर कारवाई करण्यात यावी. विशेष म्हणजे पीओपीच्या मूर्ती बसविण्यावर महाराष्ट्र शासनाकडून यापूर्वीच बंदी आणण्यात आली आहे. सदर बाबीची योग्यवेळी खबरदारी घ्यावी व महापुरुषांची विटबंना थांबवावी, अशी मागणीही मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिग्रेड, पुसदच्यावतीने करण्यात आली आहे.निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष पिंटू पाटील, उपाध्यक्ष अनिल कदम, कार्याध्यक्ष जीवा जाधव, सचिव अमोल साखरे, संभाजी ब्रिगेडचे रज्य उपाध्यक्ष सुधीर देशमुख, मराठा सेवा संघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश पानपट्टे, जिल्हा सचिव प्रा.प्रकाश लामणे, तालुकाध्यक्ष नितीन पवार, शेखर नादरे, राजू पाटील, गणेश पावडे, विक्रांत भाकरे, सुरज ठाकरे, संदीप सरकटे, किरण पाटील, वसंता राठोड, मंगेश करण, संदीप चौधरी, परीक्षित टनमने आदींच्या सह्या आहेत. (प्रतिनिधी)