शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबाद पोलीस आयुक्तांंचा तीन दिवस यवतमाळात मुक्काम

By admin | Updated: September 10, 2014 23:59 IST

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन औरंगाबादचे पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गुरुवारपासून तीन दिवस यवतमाळ शहरात तळ ठोकून राहणार आहेत. सुमारे दहा वर्षांपूर्वी घडलेल्या दोन युवकांच्या संशयास्पद

यवतमाळ : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरुन औरंगाबादचे पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह गुरुवारपासून तीन दिवस यवतमाळ शहरात तळ ठोकून राहणार आहेत. सुमारे दहा वर्षांपूर्वी घडलेल्या दोन युवकांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाची चौकशी ते करणार आहेत. राजेंद्रसिंह ११, १२ व १३ सप्टेंबर असे तीन दिवस यवतमाळात चौकशी कामी स्वत: उपस्थित राहणार आहे. त्यांच्या नेतृत्वात चौकशी केली जाईल. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातच चौकशीचे हे कामकाज होणार आहे. या चौकशीच्या अनुषंगाने याचिकाकर्ते शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शैलेश ठाकूर, घाटंजी तालुक्यातील अन्य चार जण व प्रकरणाशी संंबंधित पोलीस अधिकारी, कर्मचारी अशा सर्वांनाच साक्ष देण्यासाठी समन्स जारी करण्यात आले आहे. सुरेश सोनकुसरे आणि अजय मोहिते या दोन युवकांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण सन २००३ पासून गाजत आहे. या प्रकरणात शैलेश ठाकूर यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर निर्णय देताना न्यायालयाने औरंगाबादचे पोलीस आयुक्त राजेंद्रसिंह यांच्याकडे या मृत्यू प्रकरणाची चौकशी सोपविली. शिवाय तीन महिन्यात हा चौकशी अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर करण्याचे आदेशही जारी करण्यात आले. विशेष असे याप्रकरणात मानवाधिकार आयोगाने चार वर्षांपूर्वी सर्व संबंधितांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले होते. मात्र सरकारने या आदेशाची अंमलबजावणी करण्यास नकार दिला. त्याविरोधात शैलेश ठाकूर यांनी उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा कायम ठेवला आहे. येथील धामणगाव रोड स्थित व्यापारी बजाज आणि डॉ. श्रोत्री यांच्याकडे २००३ मध्ये दरोडा पडला होता. या प्रकरणात संशयावरून येथील सुरेश सोनकुसरे आणि अजय मोहिते या दोन तरूणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालयात असतानाच या दोघांचा मृत्यू झाला. (स्थानिक प्रतिनिधी)