शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेतील कोंडी फोडण्याचा प्रयत्न

By admin | Updated: September 11, 2014 23:51 IST

जिल्हा परिषदेत २१ सप्टेंबर रोजी अध्यक्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षाची निवड प्रक्रिया आल्याने या निवडणुकीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.

अध्यक्षपदाची निवडणूक : पुसदमध्ये अध्यक्षपदासाठी आग्रहयवतमाळ : जिल्हा परिषदेत २१ सप्टेंबर रोजी अध्यक्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षाची निवड प्रक्रिया आल्याने या निवडणुकीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. या शिवाय गेल्या अडीच वर्षापासून महागाव, पुसदमधील सदस्यांना होत असलेली कोंडी फोडण्याची संधी मिळाली आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करताना पुसद आणि महागावमधून निवडून आलेल्या १२ सदस्यांना केवळ एकाच पदावर समाधानी राहावे लागले. या व्यतिरिक्त राष्ट्रवादीतील उर्वरित आठ सदस्यात तीन महत्त्वाची पदे ठेवण्यात आली. यातही काहींना स्थायी समितीवर संधी देण्यात आली. आता अध्यक्षपदाची निवडणूक होवू घातल्याने पुसदमध्येच हे पद राहावे अशी भूमिका या परिसरातील १२ सदस्यांनी घेतली आहे. जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद हे अनुसूचित जमाती महिला प्रवर्गासाठी राखीव आहे. सध्या विद्यमान सदस्य असलेल्या अनुसूचित जमाती महिलांमध्ये सुशिक्षित आणि समाजकारणाचा अनुभव असलेल्या चेहरा म्हणून पुसद तालुक्यातील बेलोरा सर्कलच्या डॉ.आरती फुफाटे यांच्याकडे पाहण्यात येत आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेस काय भूमिका घेतात हेही महत्त्वाचे ठरणार आहे. राष्ट्रवादीतील एका गटाकडून आम्ही सर्वच पर्याय वापरणार असल्याचे सांगितले जात आहे. या उलट जुन्या जानत्यांची भूमिका काँग्रेसशिवाय राष्ट्रवादीला दुसरा कुठलाही पर्याय संयुक्तीक ठरणार नाही असाही सूर ऐकायला मिळत आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेसकडे २२ सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेसकडे २१ सदस्य त्यामध्ये १२ सदस्य हे पुसद आणि महागाव या दोन तालुक्यातून निवडून आलेले आहे. यामुळे अध्यक्ष निवडताना या सदस्यांचा प्रभाव कायम राहणार आहे. यापूर्वीच या बारा सदस्यांनी खासगीत एकंदरच कारभाराबाबत नाराजी व्यक्त केली आहे. आता अशी चूक होवू द्यायची नाही ही भूमिका घेऊन हे सदस्य आहे. (कार्यालय प्रतिनिधी)