चित्रा वाघ यांच्याविरोधात पोस्ट टाकणाऱ्यास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2021 03:48 IST2021-03-07T03:48:23+5:302021-03-07T03:48:30+5:30

मुंबई क्राईम ब्रॅंचची यवतमाळमध्ये कारवाई

Arrested for posting post against Chitra Wagh | चित्रा वाघ यांच्याविरोधात पोस्ट टाकणाऱ्यास अटक

चित्रा वाघ यांच्याविरोधात पोस्ट टाकणाऱ्यास अटक

यवतमाळ : पुण्यातील तरुणीच्या आत्महत्येचा मुद्दा भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी लावून धरला. यानंतर सोशल मीडियावर त्यांच्याविरोधात अश्लील पोस्ट टाकण्यात आल्या. तसेच त्यांना फोनवर धमक्याही देण्यात आल्या. या प्रकरणी मुंबई क्राईम ब्रँचच्या सायबर सेलने शुक्रवारी घाटंजी तालुक्यातील एकाला अटक केली तर दुसरा  फरार आहे. 

वाघ यांच्या तक्रारीवरून भादंवि कलम ३५४ (ड), ५०९, ५०६  आणि आयटी ॲक्टनुसार गुन्हा दाखल झाला आहे. यातील आरोपी राहुल तुळशीराम आडे (रा. जरंग, ता. घाटंजी) याला मुंबई क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक प्रमोद कोठेकर यांनी अटक केली. तर पोलीस आल्याची कुणकुण लागताच संतोष राठोड (रा. भांबोरा) हा पसार झाला.  थेट मुंबईचे पथक यवतमाळात दाखल झाल्याने खळबळ उडाली  होती. सोशल मीडियावर अश्लील 
पोस्ट करून चित्रा वाघ यांची बदनामी केल्याचा आणि फोनद्वारे धमकावल्याचाही या दोघांवर आरोप आहे.

Web Title: Arrested for posting post against Chitra Wagh