शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

हुंडाविरोधी कायदा ठरतोय कुचकामी

By admin | Updated: May 25, 2015 02:34 IST

हुंडा देणे आणि घेणे हे कायद्याने गुन्हा असला तरी आजही सर्रास हुंडा घेतला जातो. फरक एवढाच की हा व्यवहार आतबट्ट्याचा असतो.

दिग्रस : हुंडा देणे आणि घेणे हे कायद्याने गुन्हा असला तरी आजही सर्रास हुंडा घेतला जातो. फरक एवढाच की हा व्यवहार आतबट्ट्याचा असतो. तर काही ठिकाणी रोख रकमेऐवजी सोने घेण्याचा कल आहे. त्यातच लग्नाच्या मानपानावर मोठा खर्च करण्याची अटही घातली जाते. एकंदरित वधू पित्याकडून दुसऱ्या मार्गाने पैसा उकळण्याचा वरपक्षाचा प्रयत्न असतो. अशा स्थितीत हुंडा विरोधी कायदा कुचकामी ठरत असल्याचे दिसून येते. हुंडा विरोधी कायदा शासनाने केला आहे. मात्र तर कायद्याला न जुमानता वर पक्ष वधूपक्षाकडून वाटेल तेवढा हुंडा मोजून घेतात. मुलगा नोकरीवाला असेल तर त्याचे दरच ठरलेले असतात. काही अपवाद सोडले तर प्रत्येकच लग्नात कमी जास्त प्रमाणात हुंडा घेतला जातो. वाजत गाजत लग्न केले जाते. मुलीचा संसार सुखाचा व्हावा तिला कोणतीही अडचण जाऊ नये, अशी प्रत्येक वधू पित्याची इच्छा असते. याच इच्छेतून तो नकळत हुंडा प्रथेला खतपाणी घालत असतो. दरवर्षी शेकडो लग्न होतात. या लग्नात गरिबांपासून श्रीमंतांपर्यंत प्रत्येक जण आपल्या ऐपतीप्रमाणे खर्च करतो. मात्र काही ठिकाणी लग्नाचा बडेजाव केला जातो. मानपानावरून वाद उत्पन्न होतात. अलिकडे तर एसी हॉल आणि वरातीचा खर्च मुलीकडल्यांनी करावा, अशी अटच घातली जाते. तर काही ठिकाणी रोख रक्कम चुपच्याप घेऊन लग्न साध्या पद्धतीने लावले जाते. शासनाने हुंडा विरोधी समाज प्रबोधनासाठी विविध उपाय केले आहेत. सामाजिक संस्थांच्या माध्यमातून पथनाट्याद्वारे हुंडा प्रथेला विरोध केला जातो. (प्रतिनिधी)