शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
2
मोठी घडामोड! होर्मुज सामुद्रधुनी खुली करण्यासाठी तब्बल ३० देश एकवटले, ब्रिटन-फ्रान्सच्या नेतृत्वात मोहीम! भारताची भूमिका काय?
3
Top Marathi News LIVE Updates:राजस्थानमध्ये भीषण अपघात; स्कूल बसला ट्रकची जोरदार धडक
4
पत्नी व्हिडीओ कॉलवर बोलत होती, पतीने पाहिले, मुलाला म्हणाला, ‘जा टीव्ही बघ’, त्यानंतर...
5
ऑल टाईम हायपेक्षा २३,८७१ रुपयांनी स्वस्त मिळतंय Gold; आज सोन्या-चांदीच्या दरात घसरण, पाहा नवी किंमत
6
धक्कादायक! घरातच बलात्कार करुन मोबाईल चार्जरने गळा आवळला; दिल्लीत IRS अधिकाऱ्याच्या मुलीसोबत अमानवीय कृत्य
7
लाज आणली रे लाज आणली! हॉटेल कर्मचाऱ्यांनी सुटकेस उघडायला लावली, बालीमध्ये भारतीयांच्या चोरीचा Video व्हायरल
8
Jara Hatke: बिस्किट चहात बुडवून खायचं हे ठरवलं कुणी? कशी होती बिस्किटांची मूळ चव? माहितीय?
9
इराणला दररोज ४१०० कोटींचा फटका, तरीही चर्चेला आला नाहीय! डोनाल्ड ट्रम्प यांचे 'अखेरचे शस्त्र' ठरणार निर्णायक?
10
पेट्रोल-डिझेल विसरा, आता १००% इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या; नितिन गडकरी नेमकं काय म्हणाले?
11
विजय केडियांनी खरेदी केले 'या' कंपनीचे ४४ लाख शेअर्स, स्टॉकला लागलं अपर सर्किट; ५ वर्षांत २१००% चा रिटर्न
12
"जिंकाच, अन्यथा पर्याय नाही.."; एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची सत्तेची ‘पॉवर ब्लूप्रिंट’ तयार
13
अमरावती लैंगिक शोषण प्रकरण: मुख्य आरोपी अयान अहमदची अचलपूर शहरातून धिंड; गुन्ह्यातील पुराव्यांचा शोध सुरू
14
"रस्ता ब्लॉक होणारच, थोडा त्रासही होतोच, पण..."; 'त्या' मुद्द्यावर गिरीश महाजनांची प्रतिक्रिया
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: आवर्जून स्वामी सेवा करा; मनातील इच्छापूर्ती, अशुभता दूर होईल!
16
डोळ्यांवर पट्टी, हात-पाय बांधले... वेस्टर्न स्टाईल प्रपोजच्या बहाण्याने बॉयफ्रेंडला जिवंत जाळलं
17
कर्नाटकात होमस्टेमध्ये अमेरिकन महिलेवर अत्याचार; मालकाने तीन दिवस वायफाय बंद ठेवले, कर्मचाऱ्यालाही अटक
18
भाजप महिला आरक्षणाची सिरियल किलर, सामान्य महिलेने दाखवला खरा आक्रोश, वडेट्टीवार यांचा टोला
19
इराणला मिळाले नवे 'अण्वस्त्र'; अमेरिकेचीही पंचाईत, डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून ताबा घेण्याचा प्रयत्न
20
न्यूड व्हिडीओ कॉलसाठी २० हजार दे; अभिनेत्रीचे विद्यार्थ्यासोबतचे अश्लील चॅट व्हायरल, सोशल मीडियावर खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

संतप्त काॅंग्रेस नगरसेवकांनी रोखले जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 05:00 IST

यवतमाळ शहरात प्रत्येक रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे दिसत आहेत. कोरोना महामारीतही हे ढिगारे कायम होते. पावसाळ्यातही कचऱ्याचे ढिगारे कायम आहेत. त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलाविली होती. या बैठकीमध्ये शहरातील घाण तत्काळ स्वच्छ करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या.

ठळक मुद्देयवतमाळात कचरा प्रश्न पेटला : आदेशानंतरही कार्यवाही नाही

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : नगरपरिषदेने पावसाळ्याच्या तोंडावरही उपाययोजना केल्या नाही. याशिवाय कचऱ्याचा प्रश्न गत अनेक महिन्यांपासून गंभीर झाला आहे. यानंतरही नगरपरिषद प्रशासन हा विषय गांभीर्याने घ्यायला तयार नाही. या प्रकरणात जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्याधिकाऱ्यांना कचऱ्याच्या प्रश्नावर धारेवर धरले होते. त्यानंतरही शहरातील कचरा उचलला गेला नाही. ग्राऊंड रिॲलिटी सांगण्यासाठी संतप्त नगरसेवकांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन अडवून धरण्याचा प्रयत्न झाला तर प्रश्नाचे गांभीर्य दर्शविण्यासाठी थेट कचरा प्रवेशद्वारावरच आणून फेकण्यात आला. यामुळे शुक्रवारी एकच खळबळ उडाली. यवतमाळ शहरात प्रत्येक रस्त्यावर कचऱ्याचे ढिगारे दिसत आहेत. कोरोना महामारीतही हे ढिगारे कायम होते. पावसाळ्यातही कचऱ्याचे ढिगारे कायम आहेत. त्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरून नुकसान झाले. यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांची तातडीने बैठक बोलाविली होती. या बैठकीमध्ये शहरातील घाण तत्काळ स्वच्छ करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या होत्या. या सूचनेनंतरही नगरपरिषदेने शहरातील कचरा उचलला नाही. यामुळे शुक्रवारी कचऱ्याची परिस्थिती गंभीर होती. यामुळे नगरसेवक चंदू चौधरी, विशाल पावडे, नगरसेविका दर्शना इंगोले, पल्लवी रामटेके यांच्यासह काही नागरिकांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर कचऱ्याने भरलेला ट्रॅक्टर नेला आणि तो जिल्हाधिकाऱ्यांच्या प्रवेशद्वारावरच रिकामा करण्याचा प्रयत्न केला.याचवेळी जिल्हाधिकाऱ्यांचे वाहन जिल्हाधिकारी कार्यालयात प्रवेश करत होते. त्या वाहनाला नगरसेविका दर्शना इंगोले यांनी अडविले. यानंतरही वाहन थांबत नसल्याने त्या वाहनापुढे आडव्या झाल्या. परिस्थिती गंभीर होणार हे लक्षात येताच उपविभागीय अधिकारी माधुरी बावीस्कर यांनी त्यांना रस्त्यावरून खेचले. वाहनाला मार्ग मोकळा केला. या नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करण्याचा प्रस्ताव ठेवला. मात्र, चर्चा झाली नाही. उलट त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. नगरसेवकांनी स्थानिक प्रशासन आणि जिल्हा प्रशासनाच्या कामकाजावर आक्षेप घेत नारेबाजी केली. 

आंदोलक नगरसेवकांवर गुन्हे दाखल - जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कचऱ्याचा ट्रॅक्टर नेऊन तो रिकामा करण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी शहर पोलिसांनी चंद्रशेखर चौधरी, पल्लवी रामटेके, दर्शना इंगोले, विशाल पावडे, जुल्फीकार अहेमद यांच्यासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. त्यांच्याविरुद्ध कलम ३४१, १८८, २६९, भादंवि सहकलम १३५ यानुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हे नोंदविण्यात आले. आंदोलकांना तत्काळ पोलिसांनी ताब्यात घेतले. 

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीcongressकाँग्रेस