शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार योजनेच्या कामात गैरप्रकाराचा आरोप

By admin | Updated: May 31, 2015 02:16 IST

पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तालुक्यात सुरू असलेल्या कामात

दारव्हा : पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्याकरिता राबविण्यात येणाऱ्या राज्य शासनाच्या जलयुक्त शिवार अभियानांतर्गत तालुक्यात सुरू असलेल्या कामात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याच्या तक्रारी आहे. कामाचा दर्जा व तांत्रिक दृष्ट्या योग्य होत आहे की नाही या बाबत शंका व्यक्त केल्या जात असून करोडो रुपये खर्च करून खरोखरच पाणीटंचाईवर मात करता येईल का, असा प्रश्न गावकऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.झटपट व सोपे काम आणि मार्जीन जास्त यामुळे बहुतांश ठिकाणी राजकीय नेत्यांनी ही कामे घेतली आहे. त्यामुळे मन मानेल तसा कारभार सुरू आहे. काहीही झालं तरी अधिकारी कर्मचाऱ्यांचा टक्का सेफ आहे. त्यांच सहकार्य मिळत असल्यामुळे संगनमताने सगळा प्रकार सुरू असल्याची चर्चा आहे.सर्वासाठी पाणीटंचाई मुक्त महाराष्ट्र २०१९ अंतर्गत टंचाई परिस्थितीवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी शासनाच्यावतीने जलयुक्त शिवार अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत दारव्हा तालुक्यातील ३६ गावांची पहिल्या टप्प्याकरिता निवड करण्यात आली होती. त्यानुसार या गावांमध्ये नाला सरळीकरण, ढाळीचे बांध, शेततळे, बंधाऱ्यातील गाळ काढणे, सिमेंट प्लग बंधारे आदी कामे करण्याकरिता नोंदणी केलेल्या जेसीबी मशीनधारक व कंत्राटदारांना कृषी विभाग, सिंचन विभागाकडून कामाचे वाटप करण्यात आले.निवड ३६ गावांची झाली असली तरी प्रत्यक्षात कामे मात्र किन्ही वळगी, लाडखेड, कोलवाई, नांदगव्हाण, तेलगव्हाण, बागापूर, तेलधरी, चोपडी, धामणगाव, हातोला, ब्रह्मी, कुऱ्हाड (बु), बागवाडी, हुसनापूर, गोरेगाव, डोल्हारी (देवी), जवळा, लाखखिंड, गोंडेगाव व पिंपळखुटा या २० गावांमध्ये करण्यात येत आहे. त्यातही ज्या नोंदणीकृत मशीनधारकांच्या नावे कामे आहेत ते कामावर दिसत नाही तर त्यांच्याऐवजी विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधी च कामे करीत असल्याचे दिसून येते. खरे ठेकेदार पुढारीच असल्याचे सिद्ध होते. कोणत्याही कामावर टेक्निकल हॅन्ड दिसत नाही. केवळ जेसीबी मशीन आॅपरेटरच्या भरवशावर काम सुरू आहे. त्यामुळे काम तांत्रिकदृष्ट्या तर बरोबर नाहीच. शिवाय कामाचा दर्जाही चांगला नसल्यामुळे बंधारे किती दिवस टिकेल, शेततळे, नाला खोलीकरण, सरळीकरण याचा उपयोग पाणी साठविण्यासाठी होईल की नाही या बाबत शंका उपस्थित केल्या जात आहे. अनेक गावातील कामे अतिशय शीघ्र गतीने करण्यात येत आहे. कामाची एमबी रेकॉर्ड करताना त्यामध्ये मोठे घापले करण्यात येत असल्याच्या तक्रारी आहे. कमी कामाचे जास्त मोजमाप दाखवून बिल काढण्याा सपाटा सुरू आहे. धामणगाव (देव) येथे असाच प्रकार उघडकीस आल्यानंतर एमबीमध्ये जास्त दाखविण्यात आलेल्या मोजमापाएवढे काम नंतर करावयास लावण्यात आले. एवढ सगळ खुलेआमपणे सुरू असताना अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मात्र एकाही कामावर कारवाई केलेली नाही. त्यांना कामातील त्रुट्या दिसत नाही की जाणिवपूर्वक डोळेझाक करण्यात येत आहे. या बाबत शंका उपस्थित होत आहे. त्यांचा टक्का सेफ असल्यामुळे संगनमताने गैरप्रकार सुरू असून चांगल्या कामाची वाट लावल्या जात असल्याचा आरोप होत आहे. (तालुका प्रतिनिधी)राजकीय पदाधिकारीच बनले ठेकेदार ज्या नोंदणीकृत मशीनधारकांच्या नावे कामे आहेत ते कामावर दिसत नाही तर त्यांच्याऐवजी विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, आजी-माजी लोकप्रतिनिधीच ही कामे करीत आहेत. खरे ठेकेदार पुढारीच असल्याचे सिद्ध होते. कोणत्याही कामावर टेक्निकल हॅन्ड दिसत नाही. केवळ जेसीबी मशीन आॅपरेटरच्या भरवशावर काम सुरू आहे. त्यामुळे काम तांत्रिकदृष्ट्या तर बरोबर नाहीच. राजकीय पुढारी किंवा त्यांचे माणसे मलिदा लाटत असले तरी कामाच्या दर्जासाठी प्रत्यक्षात घटनास्थळी ते थांबत नाहीत, केवळ माणसोमाणसी कारभार सुरू असल्याने शासनाच्या या महत्वाकांक्षी योजनेचे तीन-तेरा वाजले आहे.