शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीच्या कार्यकारिणीतून प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरेंना डच्चू? ते पत्र व्हायरल, सुनेत्रा पवार म्हणाल्या...
2
Wife च्या सोबत Post Office मध्ये उघडू शकता खातं, दर महिन्याला हमीसह मिळेल ₹८६३३ चं फिक्स व्याज
3
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा दणका! शाळा, मंदिरे आणि बसस्थानकांजवळील दारू विक्रीवर बंदी
4
कोणतीही शक्ती भारताला झुकवू वा दबावाखाली आणू शकत नाही, पंतप्रधान मोदींचे विधान
5
रणवीर सिंहचा ड्रीम प्रोजेक्ट! पडद्यावर साकारणार महादेवाची भूमिका; 'या' पुस्तकावर आधारित सिनेमा
6
महामुंबई : इमारती की 'डेथ ट्रॅप': ८२७ इमारती अतिधोकादायक, १८,०७२ धोकादायक इमारती
7
Petrol Diesel Price: जागतिक बाजारपेठेत इंधनाचा भडका! जगातील अनेक देशांत पेट्रोल-डिझेलचे दर गगनाला भिडले; भारताची नेमकी स्थिती काय?
8
पुरुषांमधील ब्रेन ट्युमरच्या वाढीला रोखण्याची क्षमता टेस्टोस्टेरॉनमध्ये; संशोधनकांना मोठे यश
9
केरळ मुख्यमंत्रिपदाचा वाद काँग्रेसच्या हायकमांडच्या दरबारात, आठवडा उलटला तरी नाव निश्चित नाही
10
आजचे राशी भविष्य: १२ मे २०२६: आर्थिक लाभ होईल, आजारी व्यक्तीच्या प्रकृतीत सुधारणा होईल
11
हिमाचल-उत्तराखंडमध्ये जलप्रलय! मुसळधार पाऊस आणि गारपिटीने जनजीवन विस्कळीत; कोट्यवधींचे नुकसान
12
संकट : एक कोटी लोकांचा रोजगार धोक्यात; शेअर बाजार कोसळला, रुपया तळाला
13
इर्शाळवाडी ट्रेक ठरला जीवघेणा; डोंबिवलीतील २० वर्षीय रितेशचा मृत्यू, तरुणासोबत नक्की काय घडलं?
14
विशेष लेख: भगव्या बंगालमध्ये सगळ्यांना ‘भाकरी’ मिळेल का?
15
बाजारात 'सुवर्ण' धास्ती, देशाला बचतीची संधी; देशाला 'आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी' बनवण्याचा निर्धार
16
टिटवाळ्यात एक हजार चाळी बेकायदा, भूमाफियांकडे दुर्लक्ष; केडीएमसी महापालिकेसह पोलिसांचाही कानाडोळा
17
अन्वयार्थ: न्यायालय म्हणते, बोगस दिव्यांग ‘काळी मेंढरे’ सेवेतून हाकला !
18
लेख: शहरांनी सुरळीत धावण्यासाठी त्यांच्या पायांना कसली चाकं हवीत?
19
अग्रलेख: युद्धाच्या झळा, काटकसरीच्या कळा
20
युद्धाचा भडका उडणार? अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणचा 'तो' प्रस्ताव फेटाळला, चिंता वाढली
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय यवतमाळ बंद

By admin | Updated: July 1, 2016 02:28 IST

येथील पब्लिक स्कूलमधील विद्यार्थिनींची छेडखानी केल्याच्या निषेधार्थ गुरूवारी सर्वपक्षीय यवतमाळ बंद पाळण्यात आला.

जिल्हा कचेरीवर मोर्चा : दोषींवर कठोर कारवाईची मागणी
यवतमाळ : येथील पब्लिक स्कूलमधील विद्यार्थिनींची छेडखानी केल्याच्या निषेधार्थ गुरूवारी सर्वपक्षीय यवतमाळ बंद पाळण्यात आला. या घटनेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय कार्यकर्ते व पालकांनी मोर्चा काढला. हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी दोषींविरूद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.
यवतमाळ पब्लिक स्कूलच्या दोन शिक्षकांविरूद्ध वडगाव रोड पोलीस ठाण्यात बुधवारी विनयभंग व बाल लैंगिक अत्याचार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
यश निलमचंद बोरूंदिया व अमोल अरुण क्षीरसागर अशी या शिक्षकांची नावे आहेत. या शिक्षकांविरूद्ध बुधवारी विद्यार्थिनींच्या छेडखानीची तक्रार पालक समितीकडे केली होती. दरम्यान, शाळा व्यवस्थापनाने या शिक्षकांना पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यांना तातडीने बडतर्फ करण्यात आले. येथील दत्त चौकात सकाळी १० वाजता सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिक गोळा झाले. तेथून मोर्चांला सुरूवात झाली.
दत्त चौक, नेताजी चौक, तहसील कार्यालय, सराफा लाईन, गांधी चौक, पोलीस ठाणे, बसस्थानक चौक मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तेथे मोर्चाचे सभेत रूपांतर झाले. तत्पूर्वी अनेक मुस्लीम बांधवही या मोर्चात येऊन सहभागी झाले होते.
या सभेला माया शेरे, मनोज इंगोले, सागर पुरी, क्रांती धोटे, अमोल ढोणे, अ‍ॅड.अजय चमेडीया, तारीक लोखंडवाला आदींसह काही नागरिकांनी संबोधित केले. या सर्वांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करून दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. मोर्चात भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, मनसे आदी पक्षांच्या कार्यकर्त्यांसह नागरिक, महिला सहभागी झाल्या होत्या. उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी मोर्चाला सामोरे जाऊन दोषींविरूद्ध कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिल्यानंतर मोर्चांची सांगता झाली.
पोलिसांनी मोर्चाच्या वेळी चोख बंदोबस्त ठेवला होता. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह यांच्या मार्गदर्शनात एसडीपीओ राहुल मदने, शहर ठाणेदार नंदकिशोर पंत, वडगावरोड ठाणेदार डी.एन. ढोले परिस्थितीवर नियंत्रण ठेऊन होते.
इतर शाळांचीही सखोल चौकशी करावी
मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले. त्यात यवतमाळ पब्लिक स्कूलमधील दोन शिक्षकांनी विद्यार्थिनींचे लैंंगिक शोषण व गैरवर्तणूक केली.

‘त्या’ घटनेचा मोर्चाद्वारे सर्वपक्षीय निषेध
यवतमाळ : यवतमाळ पब्लिक स्कूलमधील विद्यार्थिनींच्या छेडखानीचे कृत्य शहराला काळीमा फासणारे असून त्याच्या निषेधार्थ गुरूवारी सर्वपक्षीय बंद पाळण्यात आला. भविष्यात अशा घटना जिल्ह्यात होऊ नये, याकरिता जातीने लक्ष घालावे. तसेच आणखी काही शिक्षक व कर्मचारी यात सहभागी आहे काय, याची चौकशी करावी. तसेच यवतमाळातील बऱ्याच शाळांमध्ये अशा प्रकारचे क्रूर व काळीमा फासणारे कृत्य होत असल्यास त्याचीसुद्धा सखोल चौकशी करावी. अशा कृत्यांकडे दुर्लक्ष करणाऱ्या शाळा प्रशासनाविरूद्ध कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. या निवेदनावर रेखा कोठेकर, सागरताई पुरी, माया शेरे, बंटी उर्फ आनंद जयस्वाल, तारीक अन्वर, मनोज इंगोले, क्रांती धोटे, राजेंद्र गायकवाड, अमोल देशमुख, अमोल ढोणे, संतोष ढवळे, अशोक पुरी, विष्णू खडसे, प्रशांत यादव, सुमीत बाजोरिया, पराग पिंगळे, अमर दिनकर, देवा शिवरामवार, मोहन सोळंकी, अनिल हमदापुरे, मनीष दुबे, दत्ता कुळकर्णी, नानाभाऊ गाडबैले, पंकज मुंदे, अजय खोंड, सुरज जैन, वैभव काळे, गौरीशंकर माने, अश्विन बोपचे, संजय आकोलकर, ज्योती मानमोडे, दिलीप पुरी, राजू पडगीलवार, अजय राऊत, अजय बिहाडे, लालजी राऊत, अशोक पुरी, चंद्रशेखर चौधरी, अंकुश बगमारे, योगेश धानोरकर, विनोद तलरेजा, वसंत ढोके आदींची नावे आहेत.

दोन्ही शिक्षक बडतर्फ, दोषींची गय नाही, चौकशीला संपूर्ण सहकार्य - किशोर दर्डा
जवाहरलाल दर्डा शिक्षण संस्थांच्यावतीने सचिव किशोर दर्डा यांनी स्पष्ट केले की, यवतमाळ पब्लिक स्कूलमध्ये घडलेली घटना केवळ दुर्दैवीच नसून अक्षम्य आहे. याबाबतीत आम्ही त्वरित कारवाई करून दोन्ही शिक्षकांना बडतर्फ केले आहे आणि या दुर्दैवी घटनेमागील सत्य शोधून काढण्यासाठी आम्ही कुठलीही कसर बाकी ठेवणार नाही. याच बरोबर भविष्यात अशी घटना घडू नये याची सर्वोतोपरी काळजी घेतली जाईल, असे आम्ही अभिवचनही देतो. जवाहरलाल दर्डा शिक्षण संस्थेने सर्व विद्यार्थ्यांना सर्वोत्तम शिक्षण प्रणाली देण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे आणि त्यामुळेच संपूर्ण विदर्भात ही शाळा अग्रणी ठरली आहे. मी स्वत:ही एक पालक आहे आणि त्यामुळेच मी पीडित पालकांच्या भावना समजू शकतो आणि त्यांना झालेल्या मानसिक यातनेबद्दल मी तीव्र दु:ख व्यक्त करतो व या घटनेची तीव्र निंदाही करतो. मी व माझी संस्था स्वत:ला त्या मुलींचे पालकच समजतो. पालकांच्या अडचणी समजून घेण्यासाठी आम्ही पालक- शिक्षक समन्वय समितीची नियमित बैठकही घेत असतो. संबंधित पालकांचे दु:ख त्यांचे एकट्यांचे नाही. ते सर्वच पालकांचे आहे. चांगल्या शिक्षकांचे, संस्थाचालकांचे व समाजाचे ते दु:ख आहे. यासारख्या घटनांचा नको तसा वापर करून समाजात अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न नेहमीच काही माणसे करतात. त्यांच्यापासूनही सावध होणे अशा वेळी गरजेचे आहे. सदर प्रकरणात पोलीस, प्रशासन व कायदा जी कारवाई करेल तिला आमचा संपूर्ण पाठिंबा व सहकार्यही असेल. अनेक दशकांच्या प्रयत्नानंतर आम्ही एक लोकाभिमूख संस्था उभी केली आहे आणि अशा नकारात्मक व्यक्तींमुळे संस्थेवर कुठलाही परिणाम होणार नाही. सर्वोत्तम अशी शिक्षण प्रणाली भविष्यातही सर्व विद्यार्थ्यांना देण्यासाठी विद्यार्थी व त्यांच्या परिवारांप्रती आमची पूर्ण बांधिलकी असल्याचे किशोर दर्डा यांनी सांगितले.

शिक्षकांना ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी
विद्यार्थिनींची छेडखानी केल्याप्रकरणी अटकेत असलेले शिक्षक यश निलमचंद बोरूंदिया व अमोल अरुण क्षीरसागर यांना जिल्हा सत्र न्यायाधीश -१ ए.टी. वानखडे यांनी ४ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बुधवारी या दोेघांना वडगाव रोड पोलिसांनी अटक केली होती. गुरुवारी चोख पोलीस बंदोबस्तात त्यांना यवतमाळ न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्यावेळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.