शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

वडगाव रोड ठाण्यात आरोपींचा राडा

By admin | Updated: May 30, 2016 00:02 IST

कौटुंबिक अत्याचारातून दोन परिवारात झालेला वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. परस्परांविरुद्ध अत्याचार आणि घरात येऊन

दोघांना अटक : अत्याचार आणि लुटमारीची परस्परविरुद्ध तक्रार यवतमाळ : कौटुंबिक अत्याचारातून दोन परिवारात झालेला वाद पोलीस ठाण्यात पोहोचला. परस्परांविरुद्ध अत्याचार आणि घरात येऊन लुटमार केल्याची तक्रार दाखल झाली. या वेळी ठाण्यात मोठी गर्दी झाली होती. ही गर्दी पांगविण्यासाठी वडगाव रोड पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागविली. यानंतर ठाण्याच्या परिसरात लुटमारीच्या घटनेतील काही आरोपी उभे असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांना अटक करताना आरोपींनी पोलिसांसोबत झटापट केली. त्यामुळे संपूर्ण रात्रभर वडगाव रोड ठाणे परिसरात गोंधळाची स्थिती होती. लुटमारीच्या घटनेतील आरोपी शेख वसीम शेख मुस्ताक (२५) रा. इसलामपुरा, शेख शहबाज शे. मुस्ताक (२२) रा. फुकटनगर यांना वडगाव रोडचे सहायक पोलीस निरीक्षक आनंद पिदूरकर आणि जमादार सुनील डोंगरे अटक करताना पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यांनी पोलिसांसोबत चांगलीच झटापट केली. यात आरोपी वसीम याने स्वत:जवळ असलेली लोखंडी हुक डोक्यावर मारुन घेतल्याची माहिती आहे. त्यानंतरही पोलिसांनी दोघांंना ताब्यात घेतले. आंबेडकरनगर परिसरातील १८ वर्षीय विवाहितेने आपल्यावरील अत्याचाराची तक्रार वडगाव रोड ठाण्यात सायंकाळी दिली. यावरून शेख सलीम शेख मेहबूब (४१) रा. असमाननगर याच्या विरुद्ध गुन्हा नोंदविला. यानंतर शेख सलीम शेख मेहबूब यांनी सदर विवाहितेच्या भावांविरोधात तीन लाख ३६ हजार रुपये जबरी चोरल्याची आणि चार लाख रुपयांचे नुकसान केल्याची तक्रार दिली. यामध्ये शेख अल्ताफ, शेख शहबाज, शेख वसीम आणि सज्जू नामक युवकासह इतर पाच ते सहा जणांविरोधात तक्रार दिली. या आरोपींनी शेख सलीम यांच्या घरात शिरुन लोखंडी पाईपने दोन दुचाकी, दोन कार, टीव्ही, घड्याळ फोडून चार लाखांच्या नुकसानची तक्रार दिली. या दोनही घटनांची तक्रार नोंदविण्यासाठी वडगाव रोड पोलीस ठाण्यात मोठा जमाव आला होता. पोलिसांनी तक्रारी नोंदवून घेतल्या. मात्र तणावाची परिस्थिती निर्माण होण्याची चिन्हे दिसताच रात्री ११.३० वाजता गर्दी पांगविण्यासाठी बळाचा वापर करावा लागला. परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर पहाटे ३.३० वाजताच्या सुमारास अंमलदार आनंद पिदूरकर यांनी अटकेची कारवाई केली. यावेळी आरोपींनी पोलिसांशी झटापट करून अटक चुकविण्याचा प्रयत्न केला. यामुळे आरोपींविरोधात पिदूरकर यांच्या तक्रारीवरून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा नोंदविला. (कार्यालय प्रतिनिधी)