शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

उमरखेड शहरात मोकाट जनावरांमुळे अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2019 06:00 IST

शहरात मोकाट जनावरांनी हैदोस घातला आहे. जनावरे चौकात ठिय्या मांडून बसल्याने दररोज अपघात होत आहे. मात्र नगरपरिषद प्रशासन अद्यापही उदासीन असल्याने वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मात्र जनावर मालकांवर कठोर कारवाई केली जात नाही.

ठळक मुद्देसंडे अँकर । नगरपरिषद प्रशासन उदासीन, मुख्य मार्गावर ठिय्या, विद्यार्थी त्रस्त, वाहनधारकांमध्ये संताप

लोकमत न्यूज नेटवर्कउमरखेड : शहरातील वर्दळीच्या नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गसह सर्व प्रमुख रस्त्यांवर मोकाट जनावरांचा ठिय्या असतो. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. मोकाट जनावरांना चुकवून वाहने चालविताना अपघात होत आहे. यात दररोज अनेक जण जखमी होत आहे. परिणामी नागरिक व वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.रस्त्यांवरील मोकाट जनावरांमुळे अपघात वाढत असल्याने नागरिक संतापले आहे. एखाद्याचा बळी गेल्यानंतरच पालिका प्रशासन मोकाट जनावर मालकांवर कारवाई करणार काय, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.पालिकेच्या उदासीनतेमुळे मोकाट जनावरांनी रस्त्यांवरच ठिय्या मांडल्याने नागरिक त्रस्त आहे. विशेषत: शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे. नांदेड, पुसद, ढाणकी, महागाव या चारही रस्त्यांवर मोकाट जनावरांचे कळप ठिय्या मांडून बसतात. २४ तास त्यांचा मुक्काम रस्त्यांवरच असतो. याशिवाय शहरातील इतर लहान रस्ते, प्रमुख सिमेंट रस्ते, डांबरी रस्त्यांवर मोकाट जनावरांनी उच्छाद मांडला आहे. त्यांच्यामुळे वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. जनावरांनी रस्त्याच्या मध्यभागी ठिय्या मांडल्याने वाहने समोर काढावी कशी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. सध्या रस्त्यांवरील खड्डे आणि जनावरांची नागरिकांमध्ये चांगलीच दहशत दिसून येत आहे.पोलिसांचेही कायम दुर्लक्षचलगतच्या जिल्ह्यात पोलिसांनी मोकाट जनावर मालकांना सीआरपीसी १४९ नुसार नोटीस बजावली. मात्र येथील पोलीस विभाग या मोकटा जनावरांकडे दुर्लक्ष करीत आहे. पालिका आणि पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुणे शहरात मोकाट जनावरांची समस्या कायम आहे. पालिा आणि पोलीस प्रशासनाने मोकाट जनावरे मालकांबाबत कठोर भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा नागरिक आणि वाहनधारकांकडून व्यक्त केली जात आहे.मालकांवर कठोर कारवाई होत नाहीशहरात मोकाट जनावरांनी हैदोस घातला आहे. जनावरे चौकात ठिय्या मांडून बसल्याने दररोज अपघात होत आहे. मात्र नगरपरिषद प्रशासन अद्यापही उदासीन असल्याने वाहनधारकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. मात्र जनावर मालकांवर कठोर कारवाई केली जात नाही.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिका