शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
2
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
3
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
4
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
5
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
6
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
7
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
8
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
9
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
10
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
11
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
12
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
13
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
14
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
15
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
16
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
17
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
18
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
19
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
20
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना टाळण्यासाठी जिल्हा कारागृहातून सोडणार ६० कैदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2020 06:00 IST

गर्दी कोरोना फैलावासाठी पोषक ठरण्याचा धोका आहे. त्यामुळे एका जनहित याचिकेच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने विविध कारागृहांतील कैद्यांची संख्या कमी करण्याचे निर्देश दिले. मात्र कोणत्या कैद्याला सोडावे, याचा विचार करण्यासाठी उच्चाधिकार समिती नेमण्याचेही राज्य सरकारांना निर्देश आहेत. महाराष्ट्रात २३ मार्च रोजी अशी समिती नेमण्यात आली आहे.

ठळक मुद्दे७२ प्रस्ताव गेले : सध्या क्षमतेपेक्षा दुप्पट कैद्यांची झालीय गर्दी

अविनाश साबापुरे ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाला रोखण्यासाठी साऱ्याच ठिकाणची गर्दी कमी केली जात आहे. त्यातच आता जिल्हा कारागृहातील गर्दी कमी करण्यासाठी ६० कैद्यांना (अंडरट्रायल प्रिझनर्स) जामिनावर सोडले जाणार आहे.सध्या जिल्हा कारागृहात क्षमतेपेक्षा अधिक कैद्यांना ठेवण्यात आले आहे. २२९ जणांची क्षमता आहे. तर प्रत्यक्षात ४०० कैदी येथे आहेत. त्यामुळे आधीच ही गर्दी सुरक्षेच्या दृष्टीने घातक असताना आता त्यात कोरोनाच्या सावटाची भर पडली आहे.गर्दी कोरोना फैलावासाठी पोषक ठरण्याचा धोका आहे. त्यामुळे एका जनहित याचिकेच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने विविध कारागृहांतील कैद्यांची संख्या कमी करण्याचे निर्देश दिले. मात्र कोणत्या कैद्याला सोडावे, याचा विचार करण्यासाठी उच्चाधिकार समिती नेमण्याचेही राज्य सरकारांना निर्देश आहेत. महाराष्ट्रात २३ मार्च रोजी अशी समिती नेमण्यात आली आहे. उच्चाधिकार समितीच्या निर्देशानुसार ज्यांना ७ वर्षे किंवा त्यापेक्षा कमी शिक्षा होण्याची शक्यता आहे, अशा कैद्यांना सोडण्याची परवानगी दिली जात आहे.या समितीकडे जिल्हा कारागृहातून ७२ कैद्यांच्या सुटकेसाठी प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत. गेल्या तीन चार दिवसांपासून यातील एकेक प्रस्ताव पडताळून जिल्हा कारागृहाकडे परवानगी पाठविली जात आहे. त्यानुसार, आतापर्यंत जवळपास २५ कैदी जामिनावर सोडण्यात आले आहे. तर आणखी एक-दोन दिवसात उर्वरित कैद्यांसाठी परवानगी प्राप्त होईल, असे जिल्हा कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी सांगितले.सुटलेल्या कैद्यांना घरात राहणे बंधनकारकदरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ज्या कैद्यांना जामिनावर सोडले जात आहे, त्यांच्या माध्यमातून गावात वेगळी परिस्थिती निर्माण होऊ नये, याचीही दक्षता घेतली जात आहे. कारागृहातून सुटल्यावर हे कैदी इतरत्र फिरत राहिले तर उलट कोरोनाचा धोका वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. शिवाय काही कैदी सराईत गुन्हेगार (हॅबीच्युअल) आहेत. त्यामुळे या कैद्यांना त्यांच्या घरापर्यंत नेऊन सोडण्यासाठी आणि तेथेच थांबविण्यासाठी पोलीस यंत्रणेची मदत मिळावी, याकरिता जिल्हा पोलीस अधीक्षकांना जिल्हा कारागृह अधीक्षकांनी पत्रही दिले आहे.परवानगीचा मेल जसा येतोय तस-तसे कैदी बंधपत्र घेऊन अंतरिम जामिनावर सोडले जात आहे. मात्र आपल्याकडून गेलेल्या ७२ प्रस्तावात काही जणांवर गंभीर केसेस आहेत. एकेका कैद्यावर १०-१५ गुन्हे दाखल आहेत. अशांच्या जामिनाचे प्रस्ताव अस्वीकृत होत आहेत. त्यामुळे ७२ पैकी ५० ते ६० जणांना जामीन मिळू शकेल. कोरोनाचे वातावरण निवळल्यानंतर त्यांना पुन्हा ताब्यात घेतले जाईल.- कीर्ती चिंतामणी,जिल्हा कारागृह अधीक्षक

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसjailतुरुंग