शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिकेतील ५६ हजार नावे रद्द

By admin | Updated: October 9, 2016 00:17 IST

सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरप्रकार दूर करण्यासाठी पुरवठा विभागाने राबविलेल्या एक्झासिस्टींग राशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टीमने (ईआरसीएमएस) जिल्ह्यातील ५६ हजार नावे राशन कार्डातून रद्द झाली आहे.

आधारने बिंग फोडले : ‘ईआरसीएमएस’चा पहिला टप्पायवतमाळ : सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गैरप्रकार दूर करण्यासाठी पुरवठा विभागाने राबविलेल्या एक्झासिस्टींग राशन कार्ड मॅनेजमेंट सिस्टीमने (ईआरसीएमएस) जिल्ह्यातील ५६ हजार नावे राशन कार्डातून रद्द झाली आहे. आधार क्रमांक यासाठी सक्तीचा करण्यात आल्याने हे बिंग फुटले आहे. यामुळे जिल्ह्यातील रास्त भाव धान्य दुकानातील गैरप्रकाराला आळा बसणार आहे.जिल्ह्यात रास्त भाव धान्य दुकानाच्या संदर्भात प्रशासनाकडे विविध तक्रारी येत होत्या. अधिक धान्य उचलूनही कमी धान्य वितरित केले जात असल्याची ओरड सातत्याने होती. अनेकदा राशन मात्र काळ्याबाजारात विकला जात होता. वेगवेगळ्या राशन कार्डावर एकाच व्यक्तीचे नाव आढळून येत होते. हा प्रकार थांबविण्यासाठी तीन वर्षांपासून ईआरसीएमएसच्या माध्यमातून काम सुरू करण्यात आले. राशन दुकानदारांचे डी-१ रजिस्टर क्रॉस चेक करण्यात आले. या मोहिमेचा पहिला टप्पा गत आठवड्यात संपला. त्यात अनेक गंभीर बाबी पुढे आल्या. एकाच व्यक्तीचे नाव वेगवेगळ्या राशन कार्डावर असणे, गाव सोडून गेलेल्या व्यक्ती, मृत व्यक्ती आणि लग्न झालेल्या मुलींचीही नावे राशन कार्डावर आढळून आली. ईआरसीएमएसमुळे हे बिंग फुटले असून त्यासाठी आधार क्रमांकाची मदत घेण्यात आली. त्यामुळे एकाच व्यक्तीची दोनदा असलेली नोंद रद्द करण्यात आली. जिल्ह््यात असे ५६ हजार नावे पुढे आले आहे. हे बिंग फुटल्याने आता राशन दुकानदारांना नवीन कोटा सुधारित नावानुसार उपलब्ध करून देण्यात येणार आहे. (शहर वार्ताहर)राशनकार्ड आॅनलाईनईआरसीएमएस प्रक्रियेतून राशन कार्डाची आॅनलाईन नोंद करण्यात आली. त्यानंतर नावे वगळण्यात आली. आता दुसऱ्या टप्प्यात राज्याच्या पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टीममध्ये ही नावे टाकली जाणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात पाच लाख ६९ हजार शिधापत्रिका आहे. यात एक लाख १४ हजार २९२ अंत्योदय, दोन लाख ८८ हजार ३६३, प्राधान्य गटातील आणि ८८ हजार ३५९ एपीएल शिधापत्रिका आहे. जिल्ह्यात चार हजार ६९६ अन्नपूर्णा शिधापत्रिका असून ११ हजार २३० शुभ्र शिधापत्रिका आहे.पुरवठा विभागातील कामकाजात पारदर्शकता आणण्यासाठी आरसी डिलशनची प्रक्रिया नुकतीच पार पाडली. यातून ५६ हजार व्यक्तींची नावे वगळण्यात आली आहे.- शालीग्राम भराडी,जिल्हा पुरवठा अधिकारी, यवतमाळ