शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
3
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
4
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
5
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
6
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
7
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
8
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
9
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
10
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
11
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
12
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
13
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
14
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
15
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
16
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
17
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
18
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
19
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
20
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
Daily Top 2Weekly Top 5

सामाजिक दायित्वातून ५० गरोदर मातांना डोहाळ जेवण

By admin | Updated: August 22, 2015 02:41 IST

मातृत्व म्हणजे स्त्रीच्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण. या आनंदाच्या काळात गर्भवतीला डोहाळे लागतात.

उमरखेड : मातृत्व म्हणजे स्त्रीच्या जीवनातील सर्वोच्च आनंदाचा क्षण. या आनंदाच्या काळात गर्भवतीला डोहाळे लागतात. यासाठीच डोहाळे जेवणाचा कार्यक्रम आयोजित केला जातो. मात्र अनेक गर्भवतींना आर्थिक परिस्थितीमुळे डोहाळे जेवण मिळतच नाही. त्यांना याही काळात कष्ट उपसावे लागते. अशा मातांना डोहाळे जेवणाचा आनंद देण्याचा उपक्रम पोफाळी येथील एका अंगणवाडी सेविकेने राबविला. एक-दोन नव्हे तर तब्बल ५० गरोदर मातांना डोहाळे जेवण दिले. या कार्यक्रमाची दखल जिल्हा परिषद प्रशासनाने घेतली असून आता हा डोहाळे जेवण पॅटर्न संपूर्ण जिल्ह्यात राबविला जाणार आहे. उमरखेड तालुक्यातील पोफाळी येथे पाच अंगणवाडी आहे. तेथील पर्यवेक्षिका प्रियंका राऊत यांनी डोहाळे जेवणाचा अभिनव उपक्रम राबविण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यानुसार पाचही अंगणवाडी केंद्रातील सेविकांना सूचना देण्यात आली. ५० गरोदर मातांना या कार्यक्रमासाठी खास निमंत्रण देण्यात आले. दोन दिवसापूर्वी पोफाळी ग्रामपंचायत कार्यालयात या ५० माता एकत्र आल्या. त्यांना केळी, सफरचंद, मोतीचूर लाडू, चिकू, डाळींब, दुध, खजूर, चवळीची उसळ, मसाले भात, शेवग्याच्या पानाचे धापळे, पोळी असे भोजन देण्यात आले.या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, महिला व बालकल्याण सभापती विमलताई चव्हाण उपस्थित होत्या. यांच्यासोबतच पंचायत समितीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी जालींदर पठारे, उमरखेडचे गटविकास अधिकारी अनिल अहीर, उपसभापती डॉ. विठ्ठलराव चव्हाण, बालविकास प्रकल्प अधिकारी आत्माराम बोंदरे, पोफाळीचे सरपंच नागोराव दोडके, पर्यवेक्षिका प्रियंका राऊत उपस्थित होत्या. जिल्ह्यात ५० गरोदर मातांना एकत्र आणून डोहाळे जेवण देण्याचा अभिनव उपक्रम राबविल्याबद्दल डॉ. कलशेट्टी यांनी कौतुक केले. तसेच हा पॅटर्न जिल्हाभर राबविण्याची घोषणा सभापती विमल चव्हाण यांनी केली. (शहर प्रतिनिधी)