शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

तस्करी नियंत्रणासाठी रेतीघाटांवर २४ तास ‘वॉच’

By admin | Updated: May 29, 2015 00:11 IST

रेतीचा अवैध उपसा थांबविण्यासाठी १६ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यांची २४ तास या घाटांवर नजर राहणार आहे.

यवतमाळ : रेतीचा अवैध उपसा थांबविण्यासाठी १६ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यांची २४ तास या घाटांवर नजर राहणार आहे. रेती तस्करी नियंत्रणात आणण्यासाठी ही पावले उचलण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी रात्रीच्या रेती उपस्यावर बंदी घालण्यासाठी कठोर पावले उचलण्यात आली होती. यानंतर भरारी पथकाची निर्मिती करण्यात आली आहे.जिल्ह्यातील ८६ रेतीघाटांपैकी ४८ रेतीघाटांचा लिलाव झाला. उर्वरित ३८ रेतीघाटांच्या लिलावासाठी प्रक्रिया पार पडली. तीन वेळा प्रक्रिया राबविल्यानंतरही कुणीही लिलाव घेतला नाही. यामुळे या घाटातील रेती मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे. विशेष म्हणजे या भागातील तस्करांनी रेतीघाट रिकामे केले आहेत. यातून पर्यावरणाला मोठा धोका निर्माण झाला आहे. सोबतच शासनाच्या तिजोरीतील महसूल पळविला आहे. यावर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.जिल्ह्यात १६ भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये उपविभागीय अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांचा समावेश राहणार आहे. हे भरारी पथक २४ तास वॉच ठेवणार आहे. त्यासाठी २५ नाक्यांवर तपासणी मोहीम राबविली जाणार आहे. यामुळे रेतीमाफीयांच्या मुसक्या आवळल्या जाणार आहे. विशेष म्हणजे दर आठ दिवसाला खनिकर्म अधिकारी भरारी पथकांचा आढावा घेणार आहे. यातून भरारी पथकांच्या कामगिरीची माहिती प्रशासनाला तत्काळ मिळणार आहे. यापूर्वी अनेक प्रयोग रेती चोरी थांबविण्यासाठी झालेले आहे. (शहर वार्ताहर)