जिल्ह्यातील २३८ ग्रामसेवकांना मिळाली पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2020 05:01 IST2020-08-03T05:00:00+5:302020-08-03T05:01:03+5:30

गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामसेवकांची कालबद्ध व आश्वासित प्रगती योजनेअंतर्गतची पदोन्नती प्रक्रिया रखडली होती. त्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन व इतर संघटनांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र अनेक वर्षांपासून पदोन्नती मिळाली नाही. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांच्याकडेही युनियनने पाठपुरावा केला. अखेर शर्मा यांनी येथून बदलून जाता जाता दहा वर्षे सेवा झालेल्या १८३ आणि २० वर्षे सेवा झालेल्या २८ व ३० वर्षे सेवा झालेल्या २७ ग्रामसेवकांना पदोन्नतीची भेट दिली.

238 Gram Sevaks in the district got promotions | जिल्ह्यातील २३८ ग्रामसेवकांना मिळाली पदोन्नती

जिल्ह्यातील २३८ ग्रामसेवकांना मिळाली पदोन्नती

ठळक मुद्देजिल्हा परिषदेचा निर्णय : जुन्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जाता-जाता दिली भेट

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्ह्यातील तब्बल २३८ ग्रामसेवकांना कालबद्ध आणि आश्वासित प्रगती योजनेंतर्गत पदोन्नती देण्यात आली. जुने मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांनी येथून बदलून जाता जाता ग्रामसेवकांना ही भेट दिली.
गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामसेवकांची कालबद्ध व आश्वासित प्रगती योजनेअंतर्गतची पदोन्नती प्रक्रिया रखडली होती. त्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन व इतर संघटनांनी वारंवार प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र अनेक वर्षांपासून पदोन्नती मिळाली नाही. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा यांच्याकडेही युनियनने पाठपुरावा केला. अखेर शर्मा यांनी येथून बदलून जाता जाता दहा वर्षे सेवा झालेल्या १८३ आणि २० वर्षे सेवा झालेल्या २८ व ३० वर्षे सेवा झालेल्या २७ ग्रामसेवकांना पदोन्नतीची भेट दिली.
ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष माणिक मस्के, सरचिटणीस हिम्मतराव म्हातारमारे आदींनी या पदोन्नतीसाठी रेटा लावला होता. अखेर २३८ ग्रामसेवकांना पदोन्नती मिळाली आहे. मात्र काहींना पदोन्नतीच्या पदाशिवाय वेतनश्रेणीचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले जाते.
पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरविंद गुडधे, विस्तार अधिकारी रामदास चंदनकर यांनी परिश्रमाने पदोन्नतीची प्रक्रिया पूर्ण केली. त्यामुळे विहित मुदतीत १०० टक्के काम झाले. तत्कालीन अधीक्षक सुनील वनकर व पंचायत विभागातील सर्व कर्मचाऱ्यांनीही पदोन्नतीसाठी परिश्रम घेतले. आता त्रुटींमुळे ज्यांचे प्रस्ताव शिल्लक राहिले अशा प्रस्तावामधील त्रूटी काढून त्यांनाही पदोन्नती देण्यासंबंधी युनियन पाठपुरावा करणार आहे. तसेच २२ आणि २४ वर्षे कालबद्ध पदोन्नतीचे प्रस्तावसुद्धा अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे आणखी काही ग्रामसेवकांना पदोन्नतीचा लाभ मिळणार असल्याचे ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष माणिक मस्के यांनी सांगितले.

Web Title: 238 Gram Sevaks in the district got promotions