शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

एकाच दिवशी १२१ पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:00 IST

दिग्रस तालुक्यात ४४ तर पांढरकवड्यात २० रुग्ण आढळले. यवतमाळमध्ये सहा व दारव्हा येथे एक रुग्ण आढळून आला. यामुळे अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४५१ इतकी झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ६६ पुरुष व ५५ महिलांचा समावेश आहे. उपचारानंतर बरे झालेल्या ३१ रुग्णांना शासकीय रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. पाच महिन्यानंतर जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णाचा आकडा एक हजार ७४ इतका झाला आहे.

ठळक मुद्देसर्वाधिक ५० पुसदमध्ये : दिग्रस ४४, पांढरकवडा २०, यवतमाळ ६, दारव्हा १

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शुक्रवारी जिल्ह्यात कोरोनाचा आतापर्यंतचा सर्वात मोठा ब्लास्ट झाला. एकाच दिवशी सर्वाधिक १२१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यातील तब्बल ५० रुग्ण एकट्या पुसद तालुक्यातील आहे. जिल्ह्याचा आतापर्यंत एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा शुक्रवारी एक हजाराच्या पार गेला आहे. जिल्हा पोलीस दलातील एक युवा अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.दिग्रस तालुक्यात ४४ तर पांढरकवड्यात २० रुग्ण आढळले. यवतमाळमध्ये सहा व दारव्हा येथे एक रुग्ण आढळून आला. यामुळे अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४५१ इतकी झाली आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये ६६ पुरुष व ५५ महिलांचा समावेश आहे. उपचारानंतर बरे झालेल्या ३१ रुग्णांना शासकीय रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. पाच महिन्यानंतर जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णाचा आकडा एक हजार ७४ इतका झाला आहे.यापैकी ५९६ रुग्ण बरे झाले आहे. तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २९ आहे. मेडिकल कॉलेजच्या आयसोलेशन वार्डात १०४ रुग्ण उपचार घेत आहे. आतापर्यंत १७ हजार १२३ नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे. त्यापैकी १४ हजार २१८ नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. यातील १३ हजार १४४ नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. अजूनही दोन हजार ९०५ नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे. कोरोना विषाणू संसर्गाची साखळी पुसद, पांढरकवडा, दिग्रस या तीन तालुक्यांच्या ठिकाणी सतत वाढताना दिसत आहे.दहा शहरात बाजारपेठ सुरूजिल्ह्यातील आर्णी, घाटंजी, उमरखेड, वणी या नगरपरिषद तर महागाव, राळेगाव, कळंब, बाभूळगाव, मारेगाव, झरीजामणी या नगरपंचायत क्षेत्रात पूर्वीप्रमाणेच कामकाज सुरू राहणार आहे. सकाळी ६ ते सायंकाळी ५ पर्यंत बाजारपेठ सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. मात्र यासाठी कोरोना नियम बंधनकारक आहे.ग्राहकांसाठी बॅक, पेट्रोल पंप खुले१ आॅगस्टपासून पुढील आदेशापर्यंत लॉकडाऊन वाढविण्यात आला असला तरी त्यात ग्राहकांसाठी बँका व पेट्रोल पंप खुले करण्यात आले आहे. सकाळी १० ते दुपारी २ या वेळात ग्राहकांना तेथे आपली कामे करता येणार आहे.सहा पालिका हद्दीत लॉकडाऊन पुढील आदेशापर्यंत वाढविलाकोरोना विषाणू संसर्गाचा विळखा वाढत आहे. पुसद, पांढरकवडा, दिग्रस, नेर, दारव्हा यवतमाळ या शहरांमध्ये पॉझिटिव्ह रुग्ण सातत्याने आढळत आहे. अशा स्थितीत जिल्हा प्रशासनाने ३१ जुलै रोजी लॉकडाऊनची संपणारी मुदत पुन्हा वाढविली आहे. पुढील आदेशापर्यंत या सहा शहरातील लॉकडाऊन कायम राहणार आहे. लॉकडाऊनच्या मुदतवाढीचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी शुक्रवारी सायंकाळी जाहीर केला.या नव्या आदेशात बँका व पेट्रोलच्या सवलती वगळता मोठा काहीही बदल नाही. पूर्वीप्रमाणेच दूध संकलन व दूध विक्रीसाठी सकाळी ७ ते १० आणि फिरते दूध विक्रीसाठी सायंकाळी ७ ते ८ अशी वेळ दिली आहे. कृषी साहित्य विक्री दुकानासाठी सकाळी १० ते दुपारी २ पर्यंतची वेळ देण्यात आली आहे. हा आदेश पुढील आदेशापर्यंत लागू राहणार आहे. लॉकडाऊन वाढविण्यासंदर्भात जिल्हाधिकारी एम.डी. सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार यांच्या उपस्थितीत सर्व यंत्रणेची संयुक्त बैठक शुक्रवारी झाली. त्यात लॉकडाऊन वाढविण्याबाबत चर्चा करण्यात आली. रुग्णसंख्या वाढत असल्याने लॉकडाऊन वाढविण्याची मागणी तालुका प्रशासनाकडून करण्यात आली. याच आधारावर पुढील आदेशापर्यंत लॉकडाऊन कायम ठेवण्यात आला आहे.

टॅग्स :CoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या