शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus in Yavatmal: यवतमाळमध्ये कोरोनाचे 12 बळी; दिवसभरात 720 नवे रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2021 19:06 IST

Corona Positive in Yavatmal जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ शहरातील 81 वर्षीय पुरुष व 61, 65, 80 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 56 व 60 वर्षीय पुरुष, पुसद शहरातील 85 वर्षीय महिला, उमरखेड तालुक्यातील 53 व 73 वर्षीय पुरुष, नेर तालुक्यातील 34 वर्षीय पुरुष आणि भंडारा शहरातील 54 महिलेचा समावेश आहे.

यवतमाळ : गत 24 तासात 12 मृत्युसह जिल्ह्यात 720 जण  नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 668 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार मृत झालेल्या व्यक्तिंमध्ये यवतमाळ शहरातील 81 वर्षीय पुरुष व 61, 65, 80 वर्षीय महिला, यवतमाळ तालुक्यातील 56 व 60 वर्षीय पुरुष, पुसद शहरातील 85 वर्षीय महिला, उमरखेड तालुक्यातील 53 व 73 वर्षीय पुरुष, नेर तालुक्यातील 34 वर्षीय पुरुष आणि भंडारा शहरातील 54 महिलेचा समावेश आहे. तसेच रविवारी पॉझेटिव्ह आलेल्या 720 जणांमध्ये 451 पुरुष आणि 269 महिला आहेत. यात यवतमाळ येथील 208 पॉझेटिव्ह रुग्ण, पुसद 147, पांढरकवडा 82, वणी 69, दिग्रस 38, दारव्हा 30, कळंब 27, नेर 19, महागाव 18, आर्णि 18, घाटंजी 16, मारेगाव 16, झरीजामणी 14, उमरखेड 9, बाभुळगाव 5 आणि इतर शहरातील 5 रुग्ण आहे.

रविवारी एकूण 4002 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 720 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 3286 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 3185 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह असून यापैकी रुग्णालयात भरती 1891 तर गृह विलगीकरणात 1294 रुग्ण आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 34050 झाली आहे. 24 तासात 668 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 30119 आहे. तर जिल्ह्यात एकूण 746 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.93 असून मृत्युदर 2.19 आहे.

     सुरवातीपासून आतापर्यंत 311566 नमुने पाठविले असून यापैकी 309554 प्राप्त तर 2012 अप्राप्त आहेत. तसेच 275504 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने कळविले आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस