शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

एसटी संपाच्या 47 दिवसांत वणी आगाराला दीड कोटींचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2021 05:00 IST

या काळात दररोज वणी आगाराला किमान पाच लाख रुपयांचे उत्पन्न होत असे; परंतु याच काळात संपामुळे एसटीची प्रवासी वाहतूक ठप्प झाल्याने त्याचा वणी आगाराच्या दररोजच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला. अन्य काळात वणी आगाराला दररोज तीन लाखांचे उत्पन्न होते. मात्र, मागील ४७ दिवसांपासून हे उत्पन्न बुडत आहे. वणी आगारातील कर्मचाऱ्यांची संख्या २२२ आहे. मात्र, त्यातील ४२ कर्मचारी टप्प्या-टप्प्याने कामावर रुजू झालेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवणी :  गेल्या ४७ दिवसांपासून सुरू असलेल्या बस कर्मचाऱ्यांच्या संपामुळे वणी आगाराला आतापर्यंत एक करोड ६० लाख रुपयांचा फटका बसला आहे. येथील आगारात आजपर्यंत ४२ कर्मचारी कामावर रुजू झाले असून १८० कर्मचारी अद्यापही संपात सहभागी आहेत. बसफेऱ्याच बंद असल्याने प्रवाशांना खासगी वाहनांचा आधार घेत दामदुप्पट भाडे देऊन प्रवास करावा लागत आहे. ३१ ऑक्टोबरपासून हा संप सुरू आहे. ऐन दिवाळीच्या पर्वात हा संप सुरू झाल्याने वणी आगाराला याचा मोठा आर्थिक फटका बसला. या काळात दररोज वणी आगाराला किमान पाच लाख रुपयांचे उत्पन्न होत असे; परंतु याच काळात संपामुळे एसटीची प्रवासी वाहतूक ठप्प झाल्याने त्याचा वणी आगाराच्या दररोजच्या उत्पन्नावर विपरीत परिणाम झाला. अन्य काळात वणी आगाराला दररोज तीन लाखांचे उत्पन्न होते. मात्र, मागील ४७ दिवसांपासून हे उत्पन्न बुडत आहे. वणी आगारातील कर्मचाऱ्यांची संख्या २२२ आहे. मात्र, त्यातील ४२ कर्मचारी टप्प्या-टप्प्याने कामावर रुजू झालेत. असे असले तरी १८० कर्मचारी मात्र आपल्या मागण्यांवर ठाम आहेत. संपकाळात वणी आगारातील २० कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले, तर पाच कर्मचारी बडतर्फ झालेत. सद्य:स्थितीत वणी आगारातून केवळ सात फेऱ्या सुरू आहेत. मधल्या काळात काही कर्मचारी रुजू झाल्यानंतर वणी आगाराने वणी-यवतमाळ व वणी-पाटण ही बसफेरी सुरू केली होती. मात्र, या दोन्ही बसवर अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली. त्यात बसचे नुकसान झाले. यवतमाळ बसवर करंजी येथे तर पाटण बसवर वणी तालुक्यातील मानकी गावाजवळ दगडफेक करण्यात आली होती. या दोन्ही घटनांनंतर संबंधित पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले.त्यानंतर वणी आगाराने बसफेऱ्या बंद केल्या. या दगडफेकीमुळे प्रवाशांच्या मनातदेखील भीती निर्माण झाली. मात्र, दोन दिवसांनंतर पुन्हा बसफेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. वणी येथून राळेगाव, पांढरकवडा, झरी, पाटण, मुकुटबन या ठिकाणी टप्प्याटप्प्याने बस सोडण्यात येत आहेत. मात्र, या फेऱ्यांना प्रवाशांचा प्रतिसाद अल्प आहे. अदिलाबाद वगळता परजिल्ह्यातून वणीत येणाऱ्या बस सध्य बंद आहेत. आदिलाबाद-वणी ही आदिलाबाद आगाराची बस मात्र येथे नियमितपणे येत आहे. बसस्थानकाबाहेर ही बस उभी राहून प्रवासी घेत आहे. त्यामुळे मुकुटबन-झरी मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.

खासगी वाहतूक फोफावली- बस कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्याने वणीत खासगी वाहतूक फोफावली आहे. वणी-चंद्रपूर मार्गावर सकाळी ६ वाजतापासून ५० ते ६० ऑटो चंद्रपूरपर्यंत प्रवाशांची ने-आण करीत आहेत. चंद्रपूरचे भाडे तब्बल ३०० रुपये आकारले जात आहे.

 

टॅग्स :ST Strikeएसटी संप