Next

माझा फोटो वापरला म्हणून भाजपची सत्ता आली, असं ठाकरे का म्हणाले? CM Uddhav Thackeray on BJP

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 02:40 PM2022-01-25T14:40:41+5:302022-01-25T14:41:47+5:30

आजारपणातून उठल्यानंतर उद्धव ठाकरेंनी काल पहिल्यांदाच ठाकरी शैलीत संवाद साधला. त्यातली दोन विधानं चर्चेत आहेत. ती म्हणजे जर आपण सीमोल्लंघन केलं असतं तर दिल्लीत शिवसेनेचा पंतप्रधान असता हे एक विधान आणि दुसरं म्हणजे भाजपनं माझा फोटो वापरला म्हणून सत्ता आली हे उद्धव ठाकरेंचं दुसरं विधान. म्हणजे २०१९ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका भाजप एकत्र लढली, त्यावेळी भाजपनं उद्धव ठाकरेंचे फोटो वापरले म्हणून सत्ता मिळाली असं उद्धव ठाकरेंचं म्हणणं आहे. आता उद्धव ठाकरे असं का म्हणाले, अचानक फोटो वापरण्याचा विषय का आला, उद्धव ठाकरेंचे फोटो वापरले त्यामुळे भाजपची सत्ता आली का यावरच बोलुयात पुढच्या काही मिनिटात पण सगळ्यात आधी बघुयात उद्धव ठाकरे काय म्हणाले ते..