Next

'या' नेत्यानं बंड केलं, फडणवीसांनी थेट उपाध्यक्ष बनवलं...फडणवीसांची आणखी एक खेळी यशस्वी Goa Election

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 02:43 PM2022-01-25T14:43:23+5:302022-01-25T14:43:47+5:30

Devendra Fadnavis | Goa Election News : देवेंद्र फडणवीस चर्चेत आहेत ते गोव्यात भाजपला लागलेल्या गळतीमुळे. म्हणजे देवेंद्र फडणवीस गोवा भाजपचे प्रभारी म्हणून गेले आणि तब्बल चार आमदारांनी राजीनामा दिला. डझनभर नेते पक्ष सोडून गेले. मनोहर पर्रीकरांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर नाराज झाले त्यांनीही पक्ष सोडला. त्यामुळे फडणवीसांची डोकेदुखी वाढत होती पण आता देवेंद्र फडणवीसांनी हळू हळू परिस्थिती सावरायला सुरुवात केलीय. सगळ्यात पहिल्यांदा तर उत्पल पर्रीकर हे माघार घ्यायला तयार झालेत, त्यांनी फडणवीसांसमोर एक अट ठेवलीय. पण उत्पल हे हट्ट सोडायला तयार झालेत त्यामागे फडणवीसांचीच शिष्टाई होती, उत्पल यांचं बंड शमवण्यासाठी फडणवीस अजूनही युद्धपातळीवर प्रयत्न करतायत. आता फडणवीसांचा आणखी एक डाव यशस्वी झालाय...