Next

शरद पवारांना खुर्ची देतानाचा राऊतांचा फोटो होतोय व्हायरल Sanjay Raut and Sharad Pawar Viral photo

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2021 02:52 PM2021-12-09T14:52:01+5:302021-12-09T14:52:31+5:30

तो फोटो... खुर्ची, राऊत आणि शरद पवार.. राजकारणात सर्वात जास्त महत्व हे खुर्चीला दिलं जाते. कारण राजकारणात लोक व्यक्तीला कमी आणि खुर्चीला जास्त महत्व देतात. असंच अनेकांना वाटतं. आता दिल्लीत खुर्चीचा असाच एक किस्सा घडलाय. महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यात शिवसेना खासदार संजय राऊत यांचे मोठे योगदान होते. तेव्हापासून राऊत हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या जास्त जवळ गेल्याचं पहायला मिळतं. शरद पवार आणि संजय राऊत यांची जवळीक दाखवणारा एक फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होतोय. संजय राऊत हे शरद पवारांना बसण्यासाठी खुर्ची देतानाचा हा फोटो आहे. हा फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे