Next

उच्चशिक्षित तरुणांकडून मानवतेचं कार्य | Corona Virus In Pune | Youth Social Work | Pune News

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 10:10 AM2021-05-11T10:10:43+5:302021-05-11T10:11:12+5:30

कोरोनाकाळात गरजूंना मदतीचा ओघ अनेकांकडून सुरूच आहे. ज्यात पुण्यातील तरुणाईची संख्या खरंच कौतुकास्पद आहे. पुण्यातील असेच काही तरुण एकत्र येऊन पुणेकरांना मदत करत आहेत. बेरोजगार, नोकरी-व्यवसाय बंद झालेले, गरीब-गरजू आणि कोरोनाकाळात रुग्णसेवेत व्यस्त असलेल्या लोकांसाठी अन्न पुरवण्याचं काम ही तरुण मंडळी करत आहेत. विशेष म्हणजे यांमध्ये वकील, इंजिनिअर, सीए, डॉक्टर, आर्किटेक्ट, विद्यार्थी असे सगळे उच्चशिक्षित मुलं-मुली आहेत. आपल्या कामातून वेळ काढून भाजी आणि इतर साहित्य विकत आणण्यापासून ते बनवण्यापर्यंत, पॅकिंगपासून ते वितरणापर्यंत सगळी कामं हेच तरुण करतात.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

टॅग्स :पुणेकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरससमाजसेवकप्रेरणादायक गोष्टीPunecorona virusCoronavirus in Maharashtrasocial workerInspirational Stories