Next

सरकारमध्ये मानसन्मान मिळत नसल्याचा आणखी एका सेना नेत्याची खदखद; उद्धव ठाकरे आता तरी दखल घेणार का?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2022 07:20 PM2022-01-07T19:20:45+5:302022-01-07T19:21:18+5:30

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आहे.. मात्र सरकार स्थापन झाल्यापासून आघाडीतील तीनही पक्षांमध्ये समन्वय नसल्याचं अनेक वेळा समोर आलं आहे.. यातील सर्वात जास्त शिवसेना पक्षात कुरबुरी असल्याचं पाहायला मिळते.. शिवसेनेच्या अनेक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी महाविकास आघाडी सरकारमध्ये आपल्याला योग्य ती वागणूक मिळत नसल्याचा आरोप केला आहे.. ज्येष्ठ नेते रामदास कदम, माजी खासदार आढळराव पाटील, माजी आमदार विजय शिवतारे त्यांनी तर जाहीररित्या राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटलेलं आहे.. त्यानंतर यामध्ये आणखी एका नेत्याची भर पडली आहे.. माजी आमदार असलेल्या शिवसेनेच्या या नेत्याने आघाडी सरकारमध्ये मानसन्मान मिळत नसल्याचे सांगत शिवसेनेला घरचा आहेर दिला.. कोण आहे तो आमदार, आणि घडलं तरी काय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...