"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2024 09:17 PM2024-05-25T21:17:31+5:302024-05-25T21:20:06+5:30

Lok Sabha Election 2024: केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission of India) शनिवारी पहिल्या पाच टप्प्यातील मतदानाच्या आकडेवारीसह संपूर्ण माहिती प्रसिद्ध केली. तसेच मतदार आणि त्यांची माहिती प्रसिद्ध करण्याच्या प्रारूपाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही निवडणूक आयोगाने सांगितले आहे.

Lok Sabha Election 2024: "There can be no change in the number of votes", the Election Commission told the doubters | "मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले

"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले

लोकसभा निवडणुकीसाठीच्या सहा टप्प्यातील मतदान आज आटोपलं. दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने शनिवारी पहिल्या पाच टप्प्यातील मतदानाच्या आकडेवारीसह संपूर्ण माहिती प्रसिद्ध केली. तसेच मतदार आणि त्यांची माहिती प्रसिद्ध करण्याच्या प्रारूपाचा विस्तार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असेही निवडणूक आयोगाने सांगितले आहे. निवडणूक आयोगाला सर्व मतदान केंद्रांवरील मतदानाची अंतिम आकडेवारी आपल्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्याचे आदेश देण्यात यावेत, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणीस सर्वोच्च न्यायालयाने नुकताच नकार दिला होता. सर्वोच्य न्यायालयाच्या या निर्णयामुळे  पूर्णपणे सशक्त असल्यासारखं वाटत असल्याची प्रतिक्रिया निवडणूक आयोगाने  दिली आहे.  

केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या पाच टप्प्यातील मतदानाची संपूर्ण माहिती प्रसिद्ध केली आहे. तसेच निवडणूक प्रक्रियेला बिघडवण्याचा एक खोडसाळ कट आणि खोद्या दाव्यांची एक पद्धत दिसून आली आहे, असेही निवडणूक आयोगाने सांगितले. मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्याच्या प्रक्रियेवरू सर्वोच्च न्यायालयाने केलेली टिप्पणी आणि घेतलेल्या निर्णयामुळे निवडणूक आयोगाला सशक्त झाल्यासारखे वाटत आहे, असेही निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

निवडणूक आयोगाने सांगितले की, १९ एप्रिल रोजी निवडणूक सुरू झाल्याच्या दिवसापासून मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध करण्याची पूर्ण प्रक्रिया अचूक, सुसंगत आणि निवडणूक कायद्यानुसार तसेत कुठल्याही विसंगतीशिवार राहिली आहे. तसेच निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी प्रसिद्ध करण्यामध्ये उशीर झाला असल्याचे आरोपही फेटाळून लावले आहेत. मतदानाच्या सर्व टप्प्यांमध्ये मतदानादिवशी सकाळी ९.३० वाजल्यापासून वोटर टर्नआऊट मोबाईल अॅपवर २४ बाय ७ उपलब्ध होती. हे अॅप १७.३० वाजेपर्यंत प्रत्येकी दोन तासांच्या आधारावर अंदाजे मतदानाची आकडेवारी सांगते. तसेच संध्याकाळी ७ वाजल्यानंतर डेटा सातत्याने अपडेट केला जातो. 

दरम्यान, मतदानाच्या आकड्यांबाबत निर्माण करण्यात येत असलेल्या प्रश्नचिन्हाबाबत निवडणूक आयोगाने सांगितले की, निवडणूक प्रक्रियेला बाधिक करण्यासाठी खोडसाळपूर्ण हेतूने एक खोटा नरेटिव्ह सेट करण्यात आला. मतांच्या संख्येमध्ये कुठलाही बदल करणं शक्य नाही. मतदानाची केंद्रनिहाय आकडेवारी प्रसिद्ध करण्याची मागणी काल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर आज निवडणूक आयोगाने मतदानाची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे.  

Web Title: Lok Sabha Election 2024: "There can be no change in the number of votes", the Election Commission told the doubters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.