लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2024 12:26 AM2024-05-26T00:26:12+5:302024-05-26T00:27:46+5:30

Lok Sabha Election 2024: देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज  ७ राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशातील ५८ जागांवर मतदान प्रक्रिया पार पडली. निवडणूक आयोगाने संध्याकाळी ७.४५ वाजेपर्यंत दिलेल्या आकडेवारीनुसार ५९.०६ टक्के एवढे मतदान झाले आहे. 

Lok Sabha Election 2024: 59.06 percent polling in the sixth phase of the Lok Sabha elections, state wise polling data | लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी

लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात ५९.०६ टक्के मतदान, अशी आहे राज्यवार आकडेवारी

देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यात आज  ७ राज्ये आणि एक केंद्रशासित प्रदेशातील ५८ जागांवर मतदान प्रक्रिया पार पडली. आज मतदान झालेल्या राज्यांमध्ये बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, झारखंड, ओदिशा, हरियाणा आणि दिल्लीमध्ये मतदान झाले. निवडणूक आयोगाने संध्याकाळी ७.४५ वाजेपर्यंत दिलेल्या आकडेवारीनुसार ५९.०६ टक्के एवढे मतदान झाले आहे. 

निवडणूक आयोगाने दिलेल्या आकडेवारीनुसार बिहारमधील लोकसभेच्या ८ जागांवर ५३.३० टक्के मतदान झाले आहे. तर उत्तर प्रदेशमधील १४ जागांवर ५४.०३ टक्के मतदान झाले आहे. जम्मूमधील एका जागेवर ५२.२८ टक्के मतदान झालं आहे. तर पश्चिम बंगालमधील लोकसभेच्या ८ जागांसाठी ७८.१९ टक्के मतदान झालं  

हरियाणामधील सर्व १० जागांसाठी आज मतदान पूर्ण झालं. हरियाणामध्ये ५८.३७ टक्के एवढ्या मतदानाची नोंद झाली. तर राजधानी दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांसाठी ५४.४८ टक्के मतदान झालं. झारखंडमधील लोकसभेच्या ४ जागांसाठी ६२.७४ टक्के मतदान झालं. तर ओदिशामधील लोकसभेच्या ६ जागांसाठी ६०.०७ टक्के एवढं मतदान झालं आहे.  

Web Title: Lok Sabha Election 2024: 59.06 percent polling in the sixth phase of the Lok Sabha elections, state wise polling data

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.