शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
4
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
5
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
6
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
7
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
8
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
9
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
10
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
11
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
12
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
13
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
14
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
15
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
16
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
17
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
18
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
19
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
20
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
Daily Top 2Weekly Top 5

अनाथ, निराधारांनी काय खायचे? कोरोनामुळे दातृत्वाचा झरा आटतोय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 12:58 IST

Washim News : कोरोनाच्या संकटामुळे दातृत्वाचा झराही आटल्यागत परिस्थिती निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गेल्या एक वर्षापासून कोरोना विषाणू संसर्गाचे संकट घोंगावत आहे. अनाथाश्रम, वृद्धाश्रम, आदी सेवाभावी संस्थादेखील यामुळे अडचणीत आल्या आहेत. कोरोनाच्या संकटामुळे दातृत्वाचा झराही आटल्यागत परिस्थिती निर्माण झाली आहे. शासनस्तरावरूनही अशा दुर्लक्षित घटकाकडे कानाडोळा केला जात असल्याने संबंधितांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील वाशिम शहरात जुने आययूडीपी काॅलनीत अंध मुलांची निवासी शाळा आहे. त्यात गतवर्षीपर्यंत ५६ मुले शिकायला व वास्तव्याला होती. १६ मार्च २०२० पासून लाॅकडाऊन जाहीर झाला आणि त्यानंतर संबंधित मुलांनाही त्यांच्या पालकांकडे रवाना करून शाळेला कुलूप लावण्यात आले. तेव्हापासून आजतागायत अंध, दिव्यांग मुले परतली नसून, त्यांचे अक्षरश: हाल होत आहेत. केकतउमरा (ता. वाशिम) येथे पांडुरंग उचितकर या समाजसेवकाचा मुलगा दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. असे असताना ध्येयवेड्या पांडुरंगने आणखी १४ अंध मुले दत्तक घेऊन त्यांचे पालनपोषण करणे सुरू केले. समाजातील काही दानदाते स्वत:हून मदत करीत असत. याशिवाय संगीतात पारंगत असलेली ही अंध मुले विविध ठिकाणी कार्यक्रम घेऊन चरितार्थ चालवत होती. कोरोनामुळे मात्र गत वर्षभरापासून या सर्व मुलांची दैना होत आहे. जिल्ह्यातील अनाथाश्रम, वृद्धाश्रम, भटक्या मुलांच्या निवासी शाळाही बंद असल्याने अनाथ, निराधारांनी नेमके खायचे काय, असा बिकट प्रश्न उभा ठाकला आहे.

अंध मुले भेटणार जिल्हाधिकाऱ्यांनाकेकतउमरा येथील चेतन ऑर्केस्ट्रा ग्रुपची चाैदाही अंध मुले लवकरच जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन आम्ही जगायचे कसे, असा प्रश्न त्यांना करणार आहेत. भीक नको; पण किमान सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी द्या, त्यावर उदरनिर्वाह करू, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली जाणार आहे.

मी गेल्या अनेक वर्षांपासून कायम विनाअनुदानित तत्त्वावर अंध मुलांसाठी निवासी शाळा चालवत आहे. त्यात गतवर्षीपर्यंत ५६ मुले होती. त्यांच्या पालनपोषणात कुठलीच उणीव ठेवली नाही; मात्र १६ मार्चपासून शाळा बंद आहे. मुलांना त्यांच्या पालकांकडे पाठवून दिले आहे. त्या मुलांचे आता हाल सुरू आहेत.- लोकचंद राठोड, सामाजिक कार्यकर्ते 

टॅग्स :washimवाशिम