शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
3
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
4
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
5
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
6
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
7
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
8
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
9
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
10
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
11
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
12
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
13
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
14
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
15
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
16
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
17
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
18
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
19
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
20
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना सिंचनासाठी मिळणार पाणी

By admin | Updated: November 12, 2014 23:22 IST

पाणी आरक्षण समितीची बैठक; पाणी सोडण्याचे वाशिम जिल्हाधिकारी कुळकर्णी यांचे आदेश.

वाशिम : जिल्ह्यातील शेतकर्‍यांना यंदाच्या रब्बी हंगामात सिंचनासाठी पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. जिल्हाधिकारी रामचंद्र कुळकर्णी यांनी आरक्षित पाणीसाठी वगळून शिल्लक राहणारे पाणी सिंचनासाठीन सोडण्याच आदेश संबधित यंत्रणेला दिले आहेत. बिगर सिंचन संस्थांच्या मागणीनुसार पाणी आरक्षित करण्यासाठी पाणी आरक्षण समितीची बैठक जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी पार पडली. या बैठकीत जिल्हाधिकार्‍यांनी सिंचनासाठी पाणी सोडण्याचे आदेश देऊन दुष्काळाने होर पळणार्‍या शेतकर्‍यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता ज. स. शिंदे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप कार्यकारी अभियंता एन. एम. राठोड, रिसोड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अधिकारी डी. एन. इंगोले, वाशिम नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वसंत इंगोले, मंगरूळपीर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी वि. ब. दातार यांच्यासह पाणी पुरवठा व पाठबंधारे विभागाचे विविध अधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील धरणे व बंधार्‍यामध्ये उपलब्ध असलेल्या उपलब्ध पाणीसाठ्याची माहिती घेतली.तसेच उन्हाळ्यामध्ये पिण्यासाठी व घरगुती वापरासाठी आवश्यक पाणीसाठा याचीही माहिती यावेळी जिल्ह्याधिका-यांनी घेतली. बिगर सिंचन पाणी वापर संस्थांकडून प्राप्त झालेल्या मागणीनुसार यावेळी जिल्ह्यातील उपलब्ध पाणी आरक्षित करण्यात आले. आरक्षित केलेल्या पाण्याव्यतिरिक्त उपलब्ध असलेले पाणी शेतीसाठी सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी यावेळी दिले.जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतीसाठी पाणी सोडले जाणार आहे. याबाबत लाभधारकांनी संबंधित सिंचन शाखा कार्यालयांशी संपर्क साधून सिंचनासाठी उपलब्ध पाणी साठ्याची माहिती घ्यावी. तसेच आपल्याकडील थकबाकी भरून पाणी मागणी अर्ज करावा, असे आवाहन लघु पाटबंधारे विभागातर्फे करण्यात आले आहे.