शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

तापाची साथ; रुग्णालय हाऊसफुल्ल !

By admin | Updated: September 19, 2014 01:26 IST

अनसिंगच्या रुग्णालयात रुग्णांचे बेहाल : जिल्हा शल्यचिकित्सकाचे दुर्लक्ष.

अनसिंग : गेल्या पंधरा दिवसांपासून अनसिंग परिसरात तापाची लाट पसरली असून, लहान बालके, वृद्ध, महिला यांच्या वाढत्या संख्येमुळे ग्रामीण रुग्णालय तुडुंब भरले असून, ग्रामीण रुग्णालयात चार डॉक्टर ऐवजी एकच डॉक्टर कार्यरत असल्यामुळे रुग्णांची हेळसांड होत असून, याकडे मात्र जिल्हा शल्यचिकित्सकाचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.अनसिंग परिसरात गेल्या पंधरा दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे परिसरातील खेड्यापाड्यांमध्ये तापाची साथ पसरली असून, जवळपास घरोघरी कुणीतरी लहान बालक, बालिका, वृद्धा तापाच्या आजाराने ग्रस्त आहे. त्यामुळे अनसिंग येथील ग्रामीण रुग्णालयात एकदम गर्दी वाढली आहे; परंतु येथील ग्रामीण रुग्णालयात गेल्या तीन महिन्यांपासून या ठिकाणी चार डॉक्टरऐवजी एकच डॉक्टर कार्यरत आहे. या ठिकाणी असलेले डॉ. आशीष मारकड एकच असून, ते त्यांच्या परिने सेवा देण्याचा प्रयत्न करीत आहेत; परंतु दररोज जवळपास २00 ओपीडी होत असून, एवढय़ा रुग्णांना एकाच डॉक्टरने तपासणे शक्य होत नसल्यामुळे दवाखान्यात तपासणीसाठी ओपीडीसाठी तासनतास रांगेत उभे राहण्याची वेळ येथील रुग्णांवर आलेली आहे. येथील ग्रामीण रुग्णालयाकडे जिल्हा शल्यचिकित्सकांचे दुर्लक्ष होत असल्याचे जाणवत आहे. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ मारकड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ओपीडी वाढली असल्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सकांना डॉक्टरची संख्या वाढविण्यासाठी अनेकवेळा लेखी, तोंडी कळविले. पण अद्याप एकही डॉक्टर दिला नाही. त्यामुळे रुग्णांची गैरसोय वाढत असल्याचे सांगीतले.