१५ दिवसांनंतर वाशिम जिल्ह्यात पाऊस!

By Admin | Updated: September 1, 2016 02:02 IST2016-09-01T02:02:02+5:302016-09-01T02:02:02+5:30

बळीराजा सुखावला; खरिपाच्या पिकांना मिळाले जीवदान.

Washim district after 15 days! | १५ दिवसांनंतर वाशिम जिल्ह्यात पाऊस!

१५ दिवसांनंतर वाशिम जिल्ह्यात पाऊस!

वाशिम, दि. ३१ : गत पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांमध्ये चिंता व्यक्त केली जात होती. ३१ ऑगस्ट रोजी दुपारी ३ वाजतापासून जिल्हय़ातील अनेक भागात जोरदार पावसाने सुरुवात केल्याने शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पोळा सणाच्या पूर्वसंध्येला पाऊस आल्याने बळीराजा सुखावला आहे.
जिल्हय़ात काही ठिकाणी ८ ते १0, तर काही ठिकाणी १५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकर्‍यांची पिके करपू लागली होती, तर काही ठिकाणी पावसाअभावी पिके पिवळी पडण्यास सुरुवात झाली होती. अनेक भागात शे तकर्‍यांनी देवाकडे सुद्धा साकडे घातले. महाप्रसाद कार्यक्रमांचे आयोजन केले. अखेर ३१ ऑगस्ट रोजी दुपारपासून पावसाने जोरदार सुरुवात केल्याने शे तकर्‍यांच्या चेहर्‍यावर हसू फुलले.
जिल्ह्यात यंदा चार लाखांहून अधिक हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. त्यामध्ये सोयाबीन, कापूस, ज्वारी, उडीद, तूर, मुग, उडीद, हळद आदी िपकांचा समावेश असून, सर्वाधिक पेरा पुन्हा एकदा सोयाबीनचाच आहे. यंदा पावसाने सुरुवातीलाच दमदार हजेरी लावल्यामुळे शेतकर्‍यांची पेरणी जुलै महिन्याच्या पूर्वार्धातच आटोपली. त्यानंतरच्या पावसामुळे पिकांची स्थिती जोमदार झाल्याने. पिकांप्रमाणेच शेतकर्‍यांचे चेहरेही हिरवेगार दिसू लागले. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंंंत पीक परिस्थिती बरी होती. परंतु पावसाने गत १५ ते २0 दिवसांपासून दडी मारल्याने माळरानावरील पिके सुकू लागली होती. गत आठवड्यात तर चांगल्या दर्जाच्या जमिनीवरील पिकांनादेखील धोका पोहोचू लागला होता. गत तीन वर्षांंंपासून निसर्गाने साथ न दिल्याने शेतकर्‍यांना अपेक्षित उत्पादन घेता आले नाही.
यावर्षी सुरुवातीपासून समाधानकारक पाऊस असल्याने पीक परिस्थिती चांगली आहे. मध्यंतरी पावसाने दडी मारल्याने पिके संकटात सापडली होती. बुधवारी दुपारनंतर पावसाने जिल्हाभरात सार्वत्रिक हजेरी लावल्याने पिकांना संजीवनी मिळाली. मंगळवारी रात्रीदरम्यान जिल्ह्यात सरासरी ११.४0 मिमी पाऊस झाला. बुधवारी दुपारनंतर वाशिम शहरासह रिसोड, मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा, मानोरा तालुक्यात दमदार पाऊस झाला. यामुळे हातातून जाणार्‍या िपकांना जीवदान मिळाले.
वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर, साखरा, कळंबा, तोंडगाव, तोरणाळा, अनसिंग, शेंदुरजना, नागठाणा, रिसोड, शिरपूर यासह ग्रामीण भागात दमदार पाऊस झाल्याने शेतकर्‍यांसह सर्वच जण सुखावले आहेत.

Web Title: Washim district after 15 days!