Washim: ४५ वर्षीय महिलेला दगडाने ठेचून मारलं; आरोपीला पकडलं आणि घटना ऐकून पोलीस हादरले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 18:22 IST2026-01-10T18:21:54+5:302026-01-10T18:22:24+5:30
Washim Crime: वाशिम रेल्वे स्थानकाच्या परिसरात एका ४५ वर्षीय महिलेचा मृतदेह आढळून आला. महिलेचे डोके दगडाने ठेचलेले होते. त्यामुळे ही हत्या असल्याचे प्रथमदर्शन स्पष्ट झाले. पण, आरोपीला अटक केल्यानंतर जे समोर आले, ते ऐकून पोलिसही हादरले.

Washim: ४५ वर्षीय महिलेला दगडाने ठेचून मारलं; आरोपीला पकडलं आणि घटना ऐकून पोलीस हादरले
Crime News: रेल्वे स्थानक परिसरात असलेल्या विश्राम कक्षाच्या परिसरात एका महिलेचा मृतदेह आढळला. पोलिसांनी पाहणी केल्यानंतर महिलेची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न आले. मृतदेहाशेजारी पुरुषाचा बेल्ट आणि खाण्याचे साहित्यही मिळाले होते. त्यावरून पोलिसांनी तपास सुरू केला आणि आरोपीपर्यंत पोहोचले. आरोपीला ताब्यात घेतले आणि चौकशी केल्यानंतर महिलेच्या हत्येचे गूढ उलगडले.
रेल्वे स्थानक परिसरातील विश्राम कक्षानजिक एका अज्ञात महिलेची दगडाने ठेचून निघृण हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी (९ जानेवारी) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी वाशिम शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
नक्की काय घडलं, पोलिसांना घटनास्थळी काय दिसले?
माहितीनुसार, विश्राम कक्षाजवळ एका ४५ ते ५० वर्षीय महिला बेशुद्धावस्थेत पडलेली असल्याची माहिती रेल्वे स्टेशन अधीक्षक कार्यालयाकडून पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी पोहोचले.
पाहणीदरम्यान विश्रामगृहाच्या विरुद्ध दिशेला असलेल्या संरक्षण भिंतीलगत अंदाजे महिला अर्धनग्न अवस्थेत आढळून आली. महिलेच्या कपाळावर जखमा आढळून आल्या. जखमांमुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झालेला होता.
घटनास्थळाजवळ ओबडधोबड, मात्र टोकदार दगड आढळून आला. परिसरात देशी व विदेशी दारूच्या रिकाम्या बाटल्याही सापडल्या होत्या. त्याचबरोबर पॅन्टचा बेल्ट आणि इतर खाण्याचे साहित्य मिळाले.
आरोपीला अटक केली अन्...
पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. चौकशी केली. त्यानंतर पोलिसांनी अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील अडुळा बाजार येथील संतोष रामराव खंडारे याला अकोला रेल्वे स्थानक परिसरातूनच अटक केली. त्याची चौकशी करण्यात आली. त्यात त्याने हत्या केल्याची कबुली दिली. आरोपीने सांगितले की, त्याने आधी महिलेवर अत्याचार केला आणि त्यानंतर दगडाने ठेचून तिला मारले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.