शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
2
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
3
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
4
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
5
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
6
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
7
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
8
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
9
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
10
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
11
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
12
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
13
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
14
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
15
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
16
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
17
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
18
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
19
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
20
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

 बसस्थानक परिसरात ‘नो पार्किंग’मध्येच वाहन पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2019 16:14 IST

वाशिम :  बसस्थानक परिसराच्या २०० मीटर अंतरापर्यंत खासगी  प्रवासी वाहनांना थांबा नाही तसेच लांब पल्ल्याच्या खासगी वाहनांना टप्पा वाहतूक करता येत नाही. असे असतानाही वाशिम येथे या नियमाचे उल्लंघन होत असल्याचे चित्र वाशिम शहरामध्ये दिसून येत आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम :  बसस्थानक परिसराच्या २०० मीटर अंतरापर्यंत खासगी  प्रवासी वाहनांना थांबा नाही तसेच लांब पल्ल्याच्या खासगी वाहनांना टप्पा वाहतूक करता येत नाही. असे असतानाही वाशिम येथे या नियमाचे उल्लंघन होत असल्याचे चित्र वाशिम शहरामध्ये दिसून येत आहे. नियमानुसार बसस्थानकापासुन २०० मीटरच्या अंतरावरूनच खाजगी वाहतुक व्हायला हवी. पण वाशिम येथे अकोलाकडे जाणाºया खाजगी बस, काली पिली वाहने व काही लक्झरी बसस्थानकाच्या प्रवेशव्दारापासून अगदी  कमी अंतरावरुन प्रवासी घेवून जातात. काही वाहने तर चक्क बसस्थानकाजवळच उभे राहतांना दिसून येतात. एस.टी. आगारातून प्रवासी पळविणारे खासगी ‘एजन्ट’ बसस्थानकामध्ये शिरुन चक्क अकोला-अकोला असे आवाज देवून प्रवाशांना घेवून जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. वाशिम येथून काही प्रमुख शहरांसह ग्रामीण भागात मात्र सर्रास खाजगी प्रवासी वाहतूक सुरू आहे.  खाजगी वाहतूक करणारी वाहने जागेवरुन निघाल्यानंतर प्रत्येक ठिकाणी थांबून टप्पा वाहतुक करते. बस वाहतुकीच्या वेळी त्या बससमोर आपले वाहन कसे  धावेल याची काळजी खासगी वाहनधारकांकडून घेतली जाते.  आॅटो व अन्य वाहनेदेखील तर बसस्थानक परिसरात २०० मिटरच्या आतच उभे केले जातात. क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी भरले जातात. या अवैध प्रवाशी वाहतुकीमुळे एस.टी. महामंडळाचे आर्थिक नुकसान तर होतच आहे.  शिवाय प्रवाशांच्या जिवित्वास सुध्दा धोका निर्माण झाला आहे. याकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे.   रुग्णांना घेवून येणाऱ्या वाहनांना आत येण्यास मुभा!खासगी वाहनांना बसस्थानक आवारात येण्यास मनाई असून त्यात प्रवासाी घेवून जाणारे वाहन असल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करण्यासाठी पोलीस कर्मचाºयांना कल्पना देण्यात येते. परंतु कोणतेही वाहन रुग्णांना घेवून बस आवारात येत असल्यास त्यास कोणताही मज्जाव नाही. याकरिताच बसस्थानकासमोरील गेट समोर लावण्यात आलेल्या पाईप काढून टाकण्यात आल्याची माहिती वाशिम आगाराकडून देण्यात आली आहे. बसस्थानकापासून २०० मिटरवर खाजगी वाहतुकीची वाहने उभी करावीत. २०० मिटरच्या आत वाहने आढल्यास त्यावर कारवाई करण्यासंदर्भात वेळोवेळी पोलीस स्टेशनशी तसेच जिल्हा पोलीस अधिक्षकांशी संपर्क केला आहे.- डी.एम. इलमे, आगार व्यवस्थापक, वाशिम

टॅग्स :washimवाशिमstate transportराज्य परीवहन महामंडळ