शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

केंद्रीय पथकाने १५ मिनिटात उरकला पाहणी दौरा

By admin | Updated: December 16, 2014 00:10 IST

मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त इरळा गावाची पहाणी.

मालेगाव (वाशिम) : दुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रातील स्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक रविवारी राज्यात दाखल झाले. जालना जिल्ह्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर केंद्रीय पथक मालेगाव तालुक्यातील इरळा गावात रात्री ७ वाजताच्या सुमारास दाखल झाले. रात्रीच्या वेळी गाड्यांच्या प्रकाशातच केंद्रीय पथकाने पाहणी दौरा अवघ्या १५ मिनिटामध्ये आटोपला. यावर्षीच्या कोरड्या दुष्काळाने शेतकर्‍यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे. संकटात अडकलेल्या शेतकर्‍यांना मदतीचा हात देण्यापूर्वी केंद्रीय पथकाकडून दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली जाते. जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र शासनाचे पथक सोमवार, १५ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास जिल्हा दौर्‍यावर येणार होते. मालेगाव तालुक्यातील इरळा येथे या पथकाकडून पाहणी दौरा व शेतकर्‍यांच्या व्यथा जाणून घेण्यात येणार होत्या. त्यामुळे सायंकाळी ५ वाजतापासूनच पथक कधी येणार, याची प्रतीक्षा सुरू होती. इरळा परिसरातील शेतकरी बहुसंख्येने गावात जमले होते. जिल्हा व तालुका प्रशासनातील अधिकारी-कर्मचार्‍यांचा ताफाही तैनात होता. अखेर रात्री ७ वाजताच्या सुमारास पथकाचे आगमन झाले. इरळा येथील सत्यनारायण लाहोटी यांच्या शेतात जाऊन पथकातील सदस्यांनी सोयाबीन व तूर पिकाची माहिती घेतली. या पथकात सिन्हा, विभागीय कृषी आयुक्त सरदार, जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी अशोक अमानकर, तहसीलदार जे.आर. विधाते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी हिंदुराव चव्हाण आदींचा समावेश होता. पथक गावात येताच शेतकर्‍यांनी या पथकाला घेराव घातला. शेतीबाबतच्या व्यथा मांडल्या. दरवर्षी साधारणत: एकरी पाच ते सहा क्विंटल सोयाबीन होते. यावर्षी मात्र ८५ किलो तर कुठे एक क्विंटलपर्यंत सोयाबीनचे उत्पादन मिळाले, असे शेतकर्‍यांनी सांगितले. अवघ्या १५ मिनिटात पाहणी करून सदर पथक कारंजाकडे रवाना झाले. वाई आणि धोत्रा येथेही या पथकाने पाहणी केली. या पथकाकडून नंतर केंद्र सरकारकडे दुष्काळी परिस्थितीचा अहवाल सादर केला जाणार आहे. *शेतात गाड्यांच्या लाईटाद्वारे पथकाची पाहणीदुष्काळाने होरपळलेल्या महाराष्ट्रातील स्थितीची पाहणी करण्यासाठी दाखल झालेले केंद्रीय पथक सोमवारी वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यामधील इरळा येथे अंधार पडल्यानंतर दाखल झाले. आता पाहणी कशी करावी म्हणून पथकात असलेल्या गाड्यांचा ताफा एका रांगेत उभा केला व शेतात उजेड पाडून पाहणी केली. यावेळी उपस्थित शेतकरी चातकासारखी पथकाची वाट पाहत होते. ते जेव्हा आले तेव्हा अनेक शेतकरी ह्यआता अंधारात काय पाहताह्ण, असे बोलले. तेवढय़ातच यांनी वरीलप्रमाणे पाहणी केल्याबरोबर येथे उपस्थित तरूण शेतकर्‍यांनी ह्यव्हॉट अँन आयडियाह्ण म्हटल्याबरोबर एकच हशा पिकला.