शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
2
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
5
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
8
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
9
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
10
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
11
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
12
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
13
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
14
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
15
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
16
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
17
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
18
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
19
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
20
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

देगावच्या निवासी शाळेचे कोविड केअर सेंटरमध्ये रुपांतर; २२९ विद्यार्थी आढळले होते पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 18:39 IST

Covid Care Center वसतिगृहाची इमारत आता कोविड केअर सेंटर म्हणून जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी गुरूवारी घोषित केली.

ठळक मुद्देकोरोनाबाधित आढळून आलेल्या २२९ विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे.सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली.

वाशिम : रिसोड तालुक्यातील देगाव येथील भावना पब्लिक स्कूल या निवासी शाळेतील कोरोनाबाधित आढळून आलेल्या २२९ विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असून, या शाळेच्या वसतिगृहाची इमारत आता कोविड केअर सेंटर म्हणून जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी गुरूवारी घोषित केली. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते यांनी २५ फेब्रुवारी रोजी शाळेला भेट देवून विद्यार्थ्यांच्या आरोग्यविषयक सद्यस्थितीचा आढावा घेतला.देगाव येथील संबंधित शाळेत आजूबाजूच्या जिल्ह्यातून विद्यार्थी दाखल झाले. कोरोना चाचणी केल्यानंतरच शाळा सुरु करण्याचे नियोजन केल्याने, शाळा सुरु होण्यापूर्वी वसतिगृहातील सर्व विद्यार्थ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये २२९ विद्यार्थी तसेच ४ शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी बाधित असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर प्रशासनाने तातडीने पावले उचलत या विद्यार्थ्यांना आवश्यक उपचार उपलब्ध करून दिले. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी २४ फेब्रुवारीला शाळेला भेट देऊन आढावा घेतला तसेच या सर्व कार्यवाहीवर देखरेख ठेवण्यासाठी सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक केली.

शाळेमध्ये डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांची पथके तैनात केली असून त्यांच्यामार्फत बाधित विद्यार्थ्यांची नियमित आरोग्य तपासणी होत आहे. २५ फेब्रुवारी रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयातील छातीचे चिकित्सक, बालरोग तज्ज्ञ डॉक्टरांसह इतर स्पेशालिस्ट डॉक्टरांनी सर्व बाधित विद्यार्थ्यांची पुन्हा एकदा आरोग्य तपासणी केली. संबंधित शाळा कोविड केअर सेंटर म्हणून घोषित केली असून शाळा व वसतीगृहाचे निजंर्तुकीकरण करण्यात आले. सहाय्यक जिल्हाधिकारी वैभव वाघमारे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर हे सातत्याने बाधित विद्यार्थ्यांच्या तब्येतीवर व त्यांना पुरविण्यात येणाऱ्या आरोग्य सुविधांवर लक्ष ठेवून आहेत.

टॅग्स :washimवाशिमcorona virusकोरोना वायरस बातम्या