सैन्यभरतीसाठी हजाराे विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:49 IST2021-09-09T04:49:28+5:302021-09-09T04:49:28+5:30

या मोर्चाचे नेतृत्व दामू अण्णा इंगोले यांनी करुन विद्यार्थ्यांच्या भावना प्रशासनासमोर मांडल्यात. गेल्या दोन वर्षांपासून सैन्यभरती बंद ...

Thousands of students marched to the Collector's office for army recruitment | सैन्यभरतीसाठी हजाराे विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा

सैन्यभरतीसाठी हजाराे विद्यार्थ्यांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर माेर्चा

या मोर्चाचे नेतृत्व दामू अण्णा इंगोले यांनी करुन विद्यार्थ्यांच्या भावना प्रशासनासमोर मांडल्यात. गेल्या दोन वर्षांपासून सैन्यभरती बंद असल्याने विद्यार्थ्यांचे वय निघून जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने ताबडतोब सैन्यभरती करावी व ३ वर्षे वयात सूट द्यावी म्हणजेच ३ वर्षे सैन्यभरतीची वयोमर्यादा वाढविण्यात यावी. तसेच निमलष्करी दलात १ लाख २७ हजार पदे रिक्त असताना केवळ २५ हजार पदांसाठी शासनाने भरतीची जाहिरात काढली. तर ती जाहिरात कमीत कमी ७५ हजार पदांसाठी काढण्यात यावी, वर्षाला किमान २ भरती घ्या, अशा मागण्या या वेळी केल्या. हा मोर्चा क्रीडा संकुलन मैदानातून, अकोला चौकमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला. विद्यार्थ्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत शहर दणाणून सोडले. सैन्यभरती केली नाही तर राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात मोर्चे काढू व त्यानंतर दिल्लीतील संसदेला घेराव घालू, असा इशारा या वेळी दामू अण्णा इंगोले यांनी दिला. जिल्हाधिकाऱ्यांना या वेळी निवेदन देण्यात आले. या मोर्च्याने आज वाशिमकरांचे लक्ष वेधले.

Web Title: Thousands of students marched to the Collector's office for army recruitment