शहरं
Join us  
Trending Stories
1
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
3
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
4
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
5
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
6
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
7
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
8
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
9
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
10
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
11
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
12
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
13
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
14
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
15
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
16
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
17
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
18
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
19
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
20
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांनी एकाच रात्री पाच दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:47 IST

बायपास परिसरातील साई संकुलमधील मातोश्री कृषिसेवा केंद्र व काटोले एरिगेशन सर्व्हिसेस या दोन दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश ...

बायपास परिसरातील साई संकुलमधील मातोश्री कृषिसेवा केंद्र व काटोले एरिगेशन सर्व्हिसेस या दोन दुकानाचे शटर वाकवून चोरट्यांनी दुकानात प्रवेश मिळविला. परंतु यात नगदी रक्कम सापडली नाही. त्यानंतर चोरट्यांनी आपला मोर्चा शिवाजी नगराकडे वळविला. तेथील मोहिनी ट्रेडर्स या दुकानाचे शटर वाकवून आत प्रवेश मिळविला. गल्ल्यातील जवळपास दीडशे रुपयांवर डल्ला मारला. त्यानंतर चोरटे भारतीय स्टेट बॅंक परिसरात गेले आणि तेथील शांती हार्डवेअर व हरिओम इलेक्ट्रिकल्स या दोन दुकानांचे शटर वाकवून जवळपास अडीच हजार रुपयांची रोकड लंपास केली. विशेष म्हणजे चोरट्यांनी फोडलेल्या एकाही दुकानातील साहित्य मात्र चोरीला गेले नाही. दरम्यान, दुकान मालकांनी कारंजा शहर पोलिसांत यासंदर्भात तक्रारी दाखल केल्याची माहिती दिली आहे. कारंजा शहरातील विविध वसाहतीत मागील काही दिवसांपासून सातत्याने चोरीच्या घटना घडत आहेत. परंतु त्यातील चोरटे मात्र जेरबंद करण्यात शहर पोलिसांना यश आले नाही. आता तर अज्ञात चोरट्यांनी एकाच रात्री पाच दुकाने फोडून एकप्रकारे नवीन ठाणेदार आधारसिंग सोनोने यांना जणू सलामीच दिली आहे.

सीसीटीव्हीत चोरटे कैद

शांती हार्डवेअरमधील सीसीटीव्हीत चोरटे कैद झाले असून, ४ सप्टेंबर रोजी पहाटे ५ वाजून ५३ मिनिटांनी चोरट्यांनी दुकानात प्रवेश मिळविल्याचे दिसून येत आहे. तसेच त्यांनी आपले चेहरे झाकले असल्याने चेहरा ओळख झाली नाही. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिघेजण दिसत असून, त्यांची दुचाकीसुध्दा दिसत आहे. परंतु दुर्दैवाने दुचाकीवरील क्रमांक दिसत नसल्याने चोरट्यांची ओळख पटली नाही.