शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

सणासुदीच्या काळात साखरेचा गोडवा घटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:50 IST

साखर प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरातील मुख्य घटक असून कोणत्याही आनंदाच्या क्षणी, शुभप्रसंगी कुटुंबीयांसह गोड पदार्थांचा आस्वाद घेण्याची भारतीय संस्कृती आहे. ...

साखर प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरातील मुख्य घटक असून कोणत्याही आनंदाच्या क्षणी, शुभप्रसंगी कुटुंबीयांसह गोड पदार्थांचा आस्वाद घेण्याची भारतीय संस्कृती आहे. परंतु, यावर्षी ऐन सणासुदीच्या तोंडावर साखरेचे भाव वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना आपल्या खर्चात कपात करावी लागत असून गोड पदार्थांच्या आवडीलाही मुरड घालावी लागत आहे. त्यात गणेशोत्सव आणि गौरीपूजन हे उत्सव तोंडावर असल्याने जनतेच्या अडचणीत अधिकच वाढ झाली आहे.

००००००००००००००००

जिल्ह्याला दररोज लागते साखर (क्विंटलमध्ये) - १३७० क्विंटल

सणासुदीत मागणी वाढली

सद्यस्थितीत सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. गणेशोत्सव, गौरी पूजन तोंडावर असून, त्यानंतर काही दिवसांतच दुर्गोत्सव, विजया दशमी, दिवाळी, हे सण साजरे केले जाणार आहे. गणेशोत्सवात मोदक, प्रसादाचे पदार्थ, गौरीपूजनात आंबिल, हलवा आदी पदार्थ केले जातात. त्यामुळे साखरेच्या मागणीत वाढ झाली आहे.

००००००००००००००००००००००

साखरेचे दर (प्रति किलो)

जानेवारी - ३४.५०

फेब्रुवारी - ३४.५०

मार्च - ३४

एप्रिल -३४.५०

मे - ३४

जून - ३४

जुलै - ३५

ऑगस्ट - ३६

सप्टेंबर ४१

का वाढले भाव

आंतरराष्ट्रीय बाजारात ब्राझीलमधून मोठ्या प्रमाणात साखरेची आवक होते. परंतु ब्राझीलमधील दुष्काळामुळे साखरेचे उत्पादन घटले असून, आंतरराष्ट्रीय बाजारातील ग्राहक आता भारताकडे वळल्याने साखरेचे दर काही प्रमाणात वाढले आहेत. भविष्यातही आणखी दरवाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती साखर व्यापाऱ्यांनी दिली आहे.

महिन्याचे बजेट वाढले

श्रावणापासून सणासुदीचा काळ सुरू होतो. त्यामुळे साखरेच्या पदार्थांचे प्रमाणही वाढत असल्याने साखरेचा वापर वाढला आहे. आता पुढे गणेशोत्सव आणि गौरीपूजन उत्सवातही साखरेचा वापर होणार आहे. साखरेचे भाव वाढल्यामुळे स्वयंपाकघराचे बजेटही बिघडले आहे.

- यमुनाबाई गडबडे, गृहिणी

दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंचे दर वाढत असताना त्यात आता त्यात साखरेचीही भर पडली आहे. त्यामुळे स्वयंपाकघरातील आर्थिक बजेटवर त्याचा परिणाम होत असून, सणासुदीतही साखर जपून वापरावी लागत असल्याने गोड पदार्थ कमी प्रमाणात करावे लागत आहेत.

- पूजा भवाने, गृहिणी