शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

सभापतीपदाच्या निवडणुकीला स्थगिती

By admin | Updated: November 14, 2014 01:29 IST

रिसोड कृऊबास सभापतीपदाची निवडणूक : न्यायालयाचा आदेश.

रिसोड : स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदाची निवडणूक दोन आठवड्याकरिता पुढे ढकलण्याचा निर्णय न्यायालयाने दिल्याने १३ नोव्हेंबरला ठरलेली सभापतीपदाची निवडणूक ऐनवेळी रद्द करण्यात आली आहे. रिसोड येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदाबाबत गत वर्षभरापासून वाद सुरु आहे. न्यायालयातही प्रकरण गेलेले आहे. त्यामुळे न्यायालयाचा आदेश आणि स्थगिती हा प्रकार तालुकावासीयांसाठी काही नवीन राहिलेला नाही. माजी सभापती श्यामराव उगले यांचे संचालक पद बरखास्त झाल्यामुळे १३ नोव्हेंबर रोजी नवीन सभापती निवडीची प्रक्रिया सहायक निबंधक मार्फत राबविण्यात आली होती. या निवडणुकीसाठी संचालक मंडळातील सर्व १७ संचालकांना नोटीस बजाविण्यात आल्या होत्या. त्यानुसार बाजार समितीचे सर्व संचालक ठरलेल्या वेळेवर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात उपस्थित झाले होते. सभा रितसर सुरु होण्यापूर्वीच न्यायालयीन आदेश व जिल्हा निबंधक यांचे पत्र तालुका सहायक निबंधकाकडे धडकले आणि निवडणूक कार्यक्रम ऐनवेळी रद्द करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रियेला १३ नोव्हेंबरपासून दोन आठवड्याकरिता अंतरिम स्थगिती देण्यात आली आहे. या प्रक्रियेकरिता सहायक निबंधक बी.एम.कोकाटे, आर.आर.सावंत यांची उपस्थिती होती. माजी सभापती उगले यांनी याबाबत नागपूर न्यायालयाकडे अपील सादर केले होते. त्यानुसार हा निर्णय देण्यात आला आहे. राज्यामध्ये मुदतवाढ कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करण्याची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे येणार्‍या काही दिवसांमध्ये काय होणार, याबाबत चर्चा रंगत आहे.