शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात कृषी सेवा केंद्रांचा बंद यशस्वी

By admin | Updated: February 10, 2016 02:12 IST

जिल्हा फर्टीलाझर्स, पेस्टीसाईडस, सिडस डिलर्स असोसिएशनच्यावतीने कृषीसेवा केंद्रांनी पाळला बंद.

वाशिम: कृषी निविदा परवान्यासाठी कृषी पदवीधर नियुक्ती आदेश रद्द करण्याच्या मागणीसाठी ९ फेब्रुवारी रोजी कृषी विक्रेत्यांनी भारत बंदचे आयोजन केले आहे. या बंदमध्ये जिल्हय़ातील दुकानदारांनी सहभागी होऊन बंद यशस्वी केल्याचे जिल्हा फर्टीलाझर्स, पेस्टीसाईडस, सिडस डिलर्स असोसिएशनच्यावतीने कळविण्यात आले आहे.केंद्र सरकारने रासायनिक खते, बी- बियाणे व कीटकनाशके विक्री परवान्याकरिता कृषी पदवी सक्ती कायदा अमलात आणला आहे. हा कायदा कृषी निविदा विक्रेत्यांसाठी जाचक आहे. त्यामुळे देश पातळीवर ९ फेब्रुवारी रोजी बंद पुकारण्यात आला होता. जिल्हय़ातील कृषी दुकानदारांनी यामध्ये सहभागी होऊन बंदला प्रतिसाद दिला, असे असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष सुनील पाटील, सचिव नितीन पाटणी यांनी कळविले. मालेगाव : शहरातील सर्व कृषी सेवा केंद्राच्या संचालकांनी संघटनेच्या वतीने ९ फेब्रुवारी २0१६ रोजी बंद पाळला असून, तहसीलदार यांना संघटनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. केंद्र सरकारने कृषी विक्रेत्यांना शैक्षणिक पदवी पात्रतेची केलेली सक्ती गैर आहे. या जाचक अटीमुळे राज्यातील हजारो विक्रेते पदवीप्राप्त नसल्यामुळे त्यांना व्यवसाय बंद करावा लागेल. या अटीमुळे व्यवसाय बंद करावा लागल्यामुळे बेरोजगारी वाढेल, अशी मागणी कृषी सेवा संचालकांनी केली आहे. कीटकनाशकाची विक्री केवळ कृषी पदवी बी.एस्सी, अँग्री, बी.एस्सी बायोटेक्नॉलॉजी असलेल्या पात्रताधारकाला करता येणार असल्याची अधिसूचना केंद्राने ५ ऑक्टोबर २0१५ रोजी जारी केली आहे. या जाचक अटीमुळे आम्हाला ग्राहकांना सेवा देता येणार नाही. या कायद्याला आमचा विरोध नसून या अटींसंदर्भात शासनाने परत एकदा विचार करावा, याकरिता आधी सूचना रद्द करण्याबाबत ९ फेब्रुवारी रोजी दुकाने बंद ठेवून निषेध व्यक्त केला व भारत बंदला पाठिंबा देत आहोत, अशा प्रकारचे निवेदन संघटनेच्यावतीने तहसीलदार सोनाली मेटकरी यांना दिले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत गायकवाड, राधेश्याम बिरला, ओमप्रकाश गट्टाणी, वनसकर, भास्कर अनसिंगकर, बाबूराव सदार, संजय मोरे, वाझुळकर, पाटील, नंदू गायकवाड, बाहेती, मंत्री, अग्रवाल, कैलास भांडेकर, मालेगाव, शिरपूर, मेडशी, जऊळका, येथील कृषी सेवाकेंद्राचे संचालक उपस्थित होते.