शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

माती परिक्षण प्रयोगशाळांचे बळकटीकरण होणार

By admin | Updated: September 11, 2014 00:43 IST

पाच वर्षासाठी : १७२९.६0 लक्ष रुपयांचा निधी मंजूर

अमोल जायभाये / खामगावराज्यामध्ये सध्या २९ शासकीय जिल्हा मृद सर्वेक्षण मृद चाचणी प्रयोगशाळा कार्यरत आहेत; मात्र या प्रयोगशाळांमध्ये अनेक समस्या आहेत. त्यावर उपाय म्हणून सर्व मृद सर्वेक्षण चाचणी प्रयोगशाळांचे बळकटीकरण करण्यासाठी ५ वर्षांची योजना तयार करण्यात आली आहे. यासाठी १७२९. ६0 लक्ष रुपयाच्या निधिला शासनाने ६ सप्टेंबर रोजी मंजूरी दिली आहे. शेतकर्‍यांना त्यांच्या शेतजमिनीतील मातीचे परिक्षण अन्नद्रव्यांच्या कमतरतेबाबतची माहिती मृद विश्लेषणाव्दारे देण्यात येते. मृद विश्लेषण केल्यावर कृषी विद्यापीठाच्या शिफारसीनुसार खतांचा योग्य वापर केल्यास शेतकर्‍यांच्या उत् पादन खर्चात बचत होऊन पीक उत्पादनात वाढ होते. यासाठी प्रयोगशाळांना आधुनिक साधनसामग्री उपलब्ध करुन देण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला आहे. मृद सर्वेक्षण ही योजना याआधी केंद्र सरकारमार्फत राबवीण्यात येत होती; मात्र केंद्राने ही योजना बंद केली. ही योजना सुरू ठेवणे आवश्यक असल्याने राज्य शासनाने याचा भार उचलला. राज्याच्या कृषि विकासात, प्रामुख्याने कोरडवाहू शेतकर्‍यांच्या उत्पन्नात भरीव वाढ होण्यासाठी व जमिनीचे आरोग्य टिकविण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर आधारीत योजना राबविण्यात येत आहे. योजनेचा कालावधीही योजना २0१४-१५ ते २0१८-१९ या पाच वर्षांसाठी राबविण्यात येत आहे. २0१४-१५ साठी ३४५.९२ लक्ष आणि २0१४-१५ ते २0१८-१९ या पाच वर्षासाठी १७२९.६0 लक्ष रुपयांचा निधी शासनाने मंजुर केला आहे.