शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

साठवण तलावाचे काम रखडले

By admin | Updated: December 24, 2014 00:33 IST

शेतकरी नाराज: लोहगाव महागाव येथील साठवण तलावासाठी जमीन अधिग्रहणाची प्रकिया अपूर्ण.

गोपाल वडते / लोहगाव महागाव (कारंजा, जि. वाशिम)कारंजा तालुक्यातील लोहगाव महागाव येथे चार वर्षांंंपूर्वी साठवण तलावाचे भूमीपुजन होऊन कामास सुरुवातही झाली; परंतु गत दोन वर्षांंंपासून विविध अडचणींमुळे चार वर्ष होत आले तरी, हा तलाव अद्यापही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात निराशेचे वातावरण आहे. ग्रामीण परिसरात पाण्याची टंचाई भासू नये, सिंचना क्षेत्रात वाढ व्हावी या उद्देशाने शासन कोट्यवधी रुपये खचरून ठिकठिकाणी बांध आणि साठवण तलावाची निर्मिती करीत असले तरी, या योजनांची प्रभावी अंमल बजावणी होत नसल्यामुळे शासनाचेच कोट्यवधी रुपयांचे नुकसानच होत असल्याचे दिसत आहे. लोहगाव महागाव येथे साधारण पाच वर्षांंंपूर्वी लघू सिंचन जलसंधारण विभागामार्फत साठवण तलावाला मंजुरी मिळाली होती. या तलावामुळे लोहगाव महागाव परिसरातील जवळपास १३८ हेक्टर शेती सिंचन होण्याची अपेक्षा असल्यामुळे शेतकरी वर्गांंंत आनंदाचे वातावरण होते. या तलावासाठी त्यावेळी आवश्यक जमिनही शेतकर्‍यांकडून अधिग्रहीत करण्यात आली. चे भूमीपुजन तत्कालीन आमदार प्रकाश डहाके यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला होता आणि भूमीपुजनानंतर साधारण पाच ते सहा महिन्यांतच या तलावाचे काम सुरू झाले. हे काम सुरळीतपणे चालु राहिल्यास मजुरांना रोजगार मिळेल आणि शेती सिंचनाचाही प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा लोहगाव महागाव परिसरातील शेतकरी आणि मजूर वर्गाकडून व्यक्त करण्यात येत होती; परंतु अपेक्षित असलेल्या तलावाचे काम गत दीड वर्षांंंपासून बंद पडले आहे. लोहगाव महागाव साठवण तलावाचे काम सुरू करून ते त्वरीत पूर्ण करावे, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे. लोहगाव महागावच्या तलावासाठी आवश्यक जमिन अधिग्रहण प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आतापर्यंत ३६ हेक्टर जमिन अधिग्रहित करण्यात आली असून, उर्वरित जमिनीच्या अधिग्रहणाची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात असल्याचे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक आर. ए. सपकाळ यांनी लोकमतशी बोलताना सांगीतले.