वाईगौळ येथे रस्ता रोको

By Admin | Updated: August 21, 2014 00:28 IST2014-08-20T22:59:54+5:302014-08-21T00:28:01+5:30

दुष्काळग्रस्ताच्या यादीतून वाशिम जिल्ह्याला वगळल्याच्या निषेधार्थ शेतकरी व शेतमजुरांनी रास्ता रोको आंदोलन कले.

Stop the road at Vighol | वाईगौळ येथे रस्ता रोको

वाईगौळ येथे रस्ता रोको

मानोरा : दुष्काळग्रस्ताच्या यादीतून वाशिम जिल्ह्याला वगळल्याच्या निषेधार्थ १९ ऑगस्ट रोजी शेतकरी व शेतमजुरांनी तालुक्यातील वाईगौळ येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्यामुळे दोन तास वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली होती. जिल्हा त्वरित दुष्काळग्रस्त जाहीर करावा, शेतकर्‍यांना दुबार व तिबार पेरणीचे हेक्टरी ३ हजाराचे अनुदान द्यावे, विद्यूत बिल माफ करावे, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक फी माफ करावी, सुशिक्षित बेरोजगारांना बेकारी भत्ता, जिल्ह्यातील अतिक्रमणधारकांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे, गुराढोरांसाठी चारा डेपो त्वरित उघडवा, शेतकर्‍यांचे १00 टक्के कर्ज माफ करून सात-बारा कोरा करावा, रोजगार हमी योजनेचे कामे सुरू करावी या मागण्यासाठी वाईगौळ येथील शेतकरी व शेतमजुरांनी रस्त्यावर लाकाडे, बैलगाड्या व रस्त्यावर ठिय्या देत बेमुदत आंदोलनाला सुरूवात केली. दरम्यान, तहसीलदार ए.जी. पाटील यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांच्या मागण्या शासन दरबारी पाठवू असे आश्‍वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

Web Title: Stop the road at Vighol