जिल्ह्यात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, १७५ जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:27 IST2021-07-11T04:27:40+5:302021-07-11T04:27:40+5:30

वाशिम येथे आयोजित रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी १६ जणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. शिबिराला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. ...

Spontaneous response to blood donation camp in the district, blood donation of 175 people | जिल्ह्यात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, १७५ जणांचे रक्तदान

जिल्ह्यात रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद, १७५ जणांचे रक्तदान

वाशिम येथे आयोजित रक्तदान शिबिरास चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी १६ जणांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान केले. शिबिराला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कावरखे, माधवराव अंभोरे, निरंकारी मिशनचे संयोजक श्रीराम जाधव, नामदेव जाधव आदिंनी भेट दिली. शिबिराच्या यशस्वीतेसाठी सेवादल संचालक दत्ता बंडेवार, सेवादल शिक्षक राजा रामवाणी यांच्यासह महादेव इंगोले, माणिक राठोड, सुभाष गोडघासे, संजय वाणी, देवीदास जाधव, डॉ. कन्हैय्यालाल चांदवाणी, संतोष केशवाणी, अरुणाताई बंडेवार, सिंधूताई अंभोरे, लताताई काकडे, कल्पना जाधव आदिंनी पुढाकार घेतला.

..........

मान्यवरांच्या भेटी

लोकमतकडून रिसोड येथे आयोजित रक्तदान शिबिरात आमदार अमित झनक, वाशिम येथील शिबिरात जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड यांनी भेट दिली, तर तहसीलदार विजय साळवे यांनी वाशिम येथे उपस्थित राहून रक्तदान केले.

....................

Web Title: Spontaneous response to blood donation camp in the district, blood donation of 175 people