शहरं
Join us  
Trending Stories
1
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
2
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
3
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
4
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
5
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
6
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
7
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
8
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
9
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
10
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
11
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
12
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
13
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
14
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
15
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
16
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
17
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
18
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
19
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
20
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
Daily Top 2Weekly Top 5

अतीटंचाईग्रस्त गावांमधील टँकरच्या फेऱ्यांवर प्रशासनाचा विशेष ‘वॉच’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2019 13:56 IST

शासनाने टँकरच्या फेऱ्यांवर आता विशेष ‘वॉच’ ठेवणे सुरू केले असून ‘जीपीएस’ यंत्रणाही पूर्ण ताकदीने सक्रीय करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील सर्वच गावांमध्ये यंदा पाणीटंचाई निर्माण झाली असून अतीटंचाईग्रस्त गावांमध्ये जिल्हा प्रशासनाकडून पाणीपुरवठ्याकरिता टँकर सुरू करण्यात आले आहेत; मात्र ते बहुतांश गावांमध्ये पोहचतच नसल्याची बाब सर्वप्रथम ‘लोकमत’ने विविधांगी वृत्तांच्या माध्यमातून उजागर केली. त्याची दखल घेऊन प्रशासनाने टँकरच्या फेºयांवर आता विशेष ‘वॉच’ ठेवणे सुरू केले असून ‘जीपीएस’ यंत्रणाही पूर्ण ताकदीने सक्रीय करण्यात आली आहे.जिल्ह्यातील लघू व मध्यम अशा एकंदरित १३४ प्रकल्पांमध्ये आजमितीस उणापूरा ४ ते ५ टक्के जलसाठा शिल्लक राहिला आहे. शंभरावर धरणे कोरडी पडली असून विहिरी, हातपंप, कुपनलिका, गावतलाव आदी जलस्त्रोतांच्या पाणीपातळीनेही तळ गाठला आहे. दरम्यान, उद्भवलेली भीषण पाणीटंचाई लक्षात घेवून जिल्हा प्रशासनाने प्राप्त झालेले मागण्यांचे प्रस्ताव निकाली काढत विहिर अधिग्रहण, विशेष नळ दुरूस्ती यासह काही अतीटंचाईग्रस्त गावांमध्ये टँकरव्दारे पाणीपुरवठा सुरू केला. मात्र, बहुतांश गावांमध्ये टँकरच्या फेºयाच होत नसल्याचे वास्तव ‘लोकमत’ विविधांगी वृत्तांच्या माध्यमातून उजागर केले. काही टँकरवर असलेली जीपीएस यंत्रणा अकार्यक्षम ठरत असल्याचेही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. त्याची दखल घेत सर्वप्रथम सर्व टँकरचे जीपीएस लोकेशन ट्रॅक करून टँकरच्या नियमित कोणत्या गावात किती फेºया होतात, याकडे लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत १६ गावांना टँकरने पाणीपुरवठा करणे सुरू असून यात गावांची संख्या आणखी वाढणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई