शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनला झळाळी; पण शेतकऱ्यांना फायदा काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:43 IST

वाशिम : जवळपास ९५ टक्के शेतकऱ्यांच्या घरातील सोयाबीन संपले आहे. बाजार समित्यांमधील आवकही घटली आहे. अशा परिस्थितीत आता सोयाबीनला ...

वाशिम : जवळपास ९५ टक्के शेतकऱ्यांच्या घरातील सोयाबीन संपले आहे. बाजार समित्यांमधील आवकही घटली आहे. अशा परिस्थितीत आता सोयाबीनला झळाळी मिळत असून, सोमवारी जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला प्रति क्विंटल नऊ हजारांवर दर मिळाले. या वाढीव दराचा फायदा काय, अशा संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.

शेतकऱ्यांना दरवर्षीच विविध संकटांतून जावे लागते. शेतमाल घरी आल्यानंतर विविध आर्थिक व्यवहार पूर्ण करण्यासाठी शेतमाल विक्री करावा लागतो. अल्प भूधारक शेतकरी तर शेतमाल तयार झाला की बाजार समितीत विक्रीसाठी आणतो. मध्यम व श्रीमंत वर्गातील काही शेतकरी भाववाढ होईल या अपेक्षेने पाच ते सहा महिने सोयाबीनची विक्री थांबवू शकतात. ऐन हंगामात सोयाबीनला २६०० ते ३६०० या दरम्यान प्रति क्विंटल दर असतात. दैनंदिन गरजा भागविण्यासाठी बहुतांश शेतकऱ्यांना अल्पदरात सोयाबीनची विक्री करण्याशिवाय दुसरा पर्यायही नसतो. सोयाबीनचा हंगाम संपल्यानंतर ७ ते ८ महिन्यांनी बाजारभाव वाढतात, याचा अनुभव दरवर्षीच शेतकऱ्यांना येतो. यंदाही जून महिन्यापासून सोयाबीनचे दर विक्रम प्रस्थापित करीत असल्याचे दिसून येते. जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोमवार, २६ जुलै रोजी सोयाबीनचे दर प्रति क्विंटल नऊ हजारांवर पोहोचले. मात्र, ९५ टक्के शेतकऱ्यांच्या घरात सध्या सोयाबीन नसल्याने या वाढीव दराचा शेतकऱ्यांना फारसा लाभ होणार नसल्याच्या प्रतिक्रिया शेतकऱ्यांमधून उमटत आहेत.

०००००

शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांना फायदा !

कोट

सोयाबीनच्या ऐन हंगामात बाजारभाव गडगडतात, याचा अनुभव दरवर्षीच शेतकऱ्यांना येतो. दर वाढले असले तरी सध्या बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन नाही. त्यामुळे या वाढीव दराचा फायदा शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांनाच अधिक होईल.

- पांडुरंग सोळंके,

प्रगतशील शेतकरी

००००

सोयाबीनचे दर आता नऊ हजारांवर गेले आहेत, परंतु याचा फायदा अल्पभूधारक व मध्यमवर्गीय शेतकऱ्यांना काहीच नाही. सोयाबीनचा शेतमाल तयार झाल्यानंतर प्रति क्विंटल सहा ते आठ हजारांदरम्यान दर असणे शेतकऱ्यांना अपेक्षित आहे.

- संजयकुमार सरनाईक,

प्रगतशील शेतकरी

००००००

सोयाबीन घरात झाल्यानंतर शेतमालाच्या दरात तेजी येत आली तर याचा सर्वाधिक लाभ शेतकऱ्यांना होईल. मात्र, ऐन हंगामातच सोयाबीनला तीन ते साडेतीन हजारांदरम्यान दर मिळतात. गरज म्हणून अनेक शेतकऱ्यांना अल्प भावात सोयाबीन विकावे लागते.

- रमेश अवचार,

प्रगतशील शेतकरी