शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

महसूलमंत्री खडसे यांच्या पुतण्यासह चौघांविरुद्ध गुन्हे दाखल

By admin | Updated: January 1, 2015 00:38 IST

आकोट बाजार समितीत ८0 लाखांचा अपहार.

आकोट (अकोला) : आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अंतर्गत बांधकामात खोटे दस्तऐवज करून संगनमताने ८0 लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्या पुतण्यासह बाजार समितीचे सभापती व अन्य दोघांविरुद्ध आकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये न्यायालयाच्या आदेशावरून बुधवार, ३१ डिसेंबर रोजी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आकोट कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २00८ ते २0१४ या कार्यकाळामध्ये बाजार समितीमधील बांधकाम करण्यात आले. सदर बांधकामात गैरव्यवहार झाल्याची तक्रार १0 जानेवारी २0१४ ला शासनाकडे माजी जि.प. उपाध्यक्ष गजानन पुंडकर यांनी केली होती. त्यानंतर अमरावती येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय यांच्याकडून थर्ड पार्टी टेक्निकल इन्स्पेक्शन करण्यात आले होते. त्यांनी सादर केलेल्या अहवालामध्ये कृ.उ.बा.स.चे सभापती रमेश हिंगणकर, माजी सचिव मोहसीन बेग मिर्झा, वास्तुशिल्पकार हरीश खडसे, कंत्राटदार सुनील अग्रवाल यांनी संगनमत करून मोजमाप पुस्तिकेमध्ये न झालेल्या तसेच अर्धवट झालेल्या कामांचे खोटे मोजमाप लिहून खोटा दस्तऐवज तयार करून तो खरा आहे, असे भासवून त्यानुसार ८0 लाख १३ हजार ३ रुपये एवढय़ा शासकीय निधीचा अपहार केल्याचे अहवालात नमूद आहे.या प्रकरणी सर्व दस्तऐवज घेऊन माजी जि.प. उपाध्यक्ष गजानन पुंडकर यांनी आकोट शहर पोलिसात तक्रार दिली होती. सदर तक्रार पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांनी दुय्यम निबंधक यांच्याकडे चौकशीकरिता पाठविली होती. दरम्यान, गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ होत असल्याच्या संशयावरून पुंडकर यांनी न्यायालयात १५६ (३) अंतर्गत तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर न्यायाधीश व्ही.एन. मोरे यांच्या समक्ष युक्तिवाद होऊन तक्रारीतील नमूद आरोपीविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश शहर पोलीस स्टेशनला देण्यात आले. या आदेशावरून आकोट शहर पोलीस स्टेशनमध्ये आरोपी बाजार समितीचे सभापती रमेश हिंगणकर, तत्कालीन सचिव मोहसीन बेग मिर्झा रा.आकोट, वास्तुशिल्पकार हरीश काशीनाथ खडसे अकोला, कंत्राटदार सुनील अग्रवाल परतवाडा यांचे विरुद्ध भादंविच्या ४0६, ४२0, ४६0, ४६८, ४७१, ४७0, ३४ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामधील आरोपी हरीश खडसे हे राज्याचे महसूल व कृषिमंत्री एकनाथ खडसे यांचे पुतणे आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास ए.पी.आय. नितीन पाटील करीत आहेत.