शहरं
Join us  
Trending Stories
1
२ भारतीय जहाजांवर होर्मुझमध्ये गोळीबार, इराणची मोठी प्रतिक्रिया; अधिकारी म्हणाले, “लवकरच...”
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
4
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
5
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
6
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
7
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
9
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
10
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
11
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
12
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
13
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
14
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
16
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
17
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
18
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
19
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
20
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात निर्बंध कडक; सायंकाळी ५ पर्यंतच खुली राहणार दुकाने!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2021 12:09 IST

Restrictions strict in Washim District जिल्ह्यातील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा एक भाग म्हणून संचारबंदीचा सुधारीत आदेश जिल्हाधिकारी शण्मुुराजन एस. यांनी २१ फेब्रुवारी रोजी जारी केला. त्यानुसार जिल्ह्यातील दुकाने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांविरूद्ध नियमानुसार कारवाई करण्याचा इशाराही जिल्हा प्रशासनाने दिला. अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांमध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असल्याने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी पाचही जिल्हाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार वाशिम जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी रविवारी संचारबंदीचा सुधारीत आदेश जारी केली असून, याचे पालन करण्याचे आवाहन केले. जिल्ह्यातील सर्व प्रकारची दुकाने /आस्थापने सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहणार आहेत. सर्व प्रकारचे शासकीय कार्यालये (अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी वगळून) हे १५ टक्के किंवा १५ व्यक्ती यापैकी जी संख्या जास्त असेल ती ग्राहय धरुन सुरु राहणार आहेत. सर्व प्रकारची उपाहारगृहे/, हॉटेल्स प्रत्यक्ष सुरु न ठेवता फक्त पार्सल सुविधेस परवानगी राहील. लग्नसमारंभाकरिता २५ व्यक्तींना (वधू व वरासह) परवानगी राहणार आहे. सर्व प्रकारची शैक्षणिक कार्यालये (महाविदयालये, शाळा) येथील अशैक्षणीक कर्मचारी, संशोधन कर्मचारी, वैज्ञानिक यांना ई-माहिती, उत्तरपत्रिका तपासणे, निकाल घोषित करणे आदी कामांकरीता परवानगी राहील. मालवाहतूक ही नेहमीप्रमाणे सुरु राहील आणि वाहतूकसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाही. आंतरजिल्हा बस वाहतुकीस ५० टक्के प्रवासी क्षमतेसह परवानगी राहील. 

प्रत्येक रविवारी दिवसभर संचारबंदी!यापुढे सर्व प्रकारचे बाजार, बाजारपेठ क्षेत्रातील दुकाने ही सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरु राहतील. आठवड्याअखेर शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत असलेल्या संचारबंदीच्या वेळी बाजारपेठ बंद राहतील. प्रत्येक रविवारी दिवसभर संचारबंदी राहणार असून, या काळात दुकाने बंद राहतील. आठवडा अखेर असलेल्या संचारबंदीच्या वेळी दुग्धविक्रेते/डेअरी यांची दुकाने यापुढे सकाळी ९ ते सायंकाळी ५ पर्यंत (आठवड्याचे सातही दिवस) नियमितपणे सुरु राहतील.

हाॅटेलमधील पार्सल सुविधा सुरू ठेवण्यास मुभाजिल्ह्यातील सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल प्रत्यक्ष सुरू न ठेवता केवळ पार्सल सुविधा सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. सर्व धार्मिक स्थळे ही केवळ एका वेळी १० व्यक्तींपर्यंत मर्यादित स्वरूपात नागरिकांसाठी सुरू राहतील. सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, कार्यक्रम व इतर स्नेहसंमेलन बंद राहणार आहेत. 

मालवाहतूक पूर्वीप्रमाणे सुरू राहणार!मालवाहतूक ही पूर्वीप्रमाणे सुरू राहील आणि वाहतुकीसाठी कुठल्याही प्रकारचे निर्बंध राहणार नाहीत. सर्व प्रकारची सार्वजनिक व खाजगी वाहतूक करताना चारचाकी वाहनांमध्ये चालकाव्यतिरिक्त इतर तीन प्रवाशांना परवानगी राहणार आहे.  तीन चाकी वाहनात चालकाव्यतिरिक्त दोन प्रवासी, दुचाकीवर हेल्मेट व मास्कसह दोन प्रवासी यांना परवानगी राहील. आंतरजिल्हा बस वाहतूक करताना एकूण प्रवाशी क्षमतेच्या ५० टक्के प्रवाशांसह फिजिकल डिस्टन्सिंग व निर्जंतुकीकरण करून वाहतुकीला परवानगी राहील. 

टॅग्स :washimवाशिमCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक