शहरं
Join us  
Trending Stories
1
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
2
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
3
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
4
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
5
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
8
मूर्ती लहान, कीर्ती महान! ३ वर्षे ११ महिन्यांच्या जान्हवी सोनीची कमाल; नावावर ३ इंटरनॅशनल रेकॉर्ड
9
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
10
संतापजनक! पिझ्झा तयार करताना थुंकायचा; किळसवाणा Video व्हायरल, लोकांनी बेदम चोपलं
11
सोनं खरेदी करू नका, असं आवाहन इंदिरा गांधींनी खरंच केलं होतं का?; व्हायरल कात्रणामागचं सत्य काय?
12
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
13
Travel : भारताच्या 'मिनी थायलंड'पासून अवघ्या ३ तासांवर आहे 'हे' सुंदर ठिकाण; निसर्गात रमून थकवा विसराल!
14
‘सनातन धर्माला संपवलंच पाहिजे’, विजय यांच्यासमोर उदयनिधींचं विधान, मुख्यमंत्र्यांनी दिला असा प्रतिसाद
15
कल्याणमध्ये ७८ वर्षीय भोंदूबाबाचा अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
16
NEET Exam Paper Leak : "पप्पा, हाच पेपर येईल, हॉस्टेलमधील मुलींना द्या"; NEET चं केरळ कनेक्शन, १८० पैकी १३० प्रश्न लीक
17
कान्समध्ये अवतरली जणू स्वप्नातील परी! मिंट-ग्रीन गाऊनमध्ये आलिया भट्टचा 'प्रिन्सेस लूक' व्हायरल
18
Vastu Shastra: घरात पैसे टिकत नाहीत? मग चुकूनही 'या' दिशेला ठेवू नका तुमची तिजोरी!
19
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
20
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात पावसाचा मुक्काम वाढला

By admin | Updated: July 22, 2014 22:05 IST

दुसर्‍या दिवशीही पाऊस सुरूच

वाशिम : जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्री सुरू झालेला पाऊस सलग दुसर्‍या दिवशीही (दि. २२ जुलै) सुरूच होता. कधी रिमझिम तर कधी रिपरिप कोसळणार्‍या सरींमुळे शेतकर्‍यांच्या चेहर्‍यावर हास्य खुलत होते. दरम्यान जिल्हाभरात जूनच्या सुरूवातीपासून तर २१ जुलैपर्यत केवळ ७९३.७0 मिलीमिटर पाऊस झाला आहे. गतवर्षीच्या तुलनेत हा निम्म्यापेक्षाही कमी असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते.
यंदा मृग नक्षत्रापासूनच पावसाने दडी मारली होती. परिणामी शेतकरी कमालीचे हवालदिल झाले होते. या आठवड्यात जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली.
यंदाच्या पावसाळ्यातील सर्वात अधिक पाऊस २२ जुलैला झाला. २१ जुलैच्या रात्रीपासूनच पावसाला सुरूवात झाली होती. २२ जुलैला दिवसभर पाऊस सुरूच होता. या पावसामुळे वाशिम शहरातील नाले यंदा पहिल्यांदाच वाहल ेयंदा सर्वात कमी पाऊस झालेल्या मानोरा तालुक्यातही गत २४ तासात ५.१0 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान दोन तिन दिवसात जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी लागण्याची शक्यता वर्तविली जात आहे. जिल्हा प्रशासनानेही याला दुजोरा दिला आहे.

** जिल्ह्यात अतवृष्ट्रीचा इशारा
आगामी २४ तासात जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वेधशाळेने व्यक्त केली आहे. स्थानिक नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापण कक्षाला २२ जुलैला दुपारीच एक पत्र पाठवून आपत्तीशी मुकाबला करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हा आपत्ती व्यवस्थापण अधिकारी बाळासाहेब बोराडे यांनी आपल्या यंत्रणेला सतर्क राहण्याच्या सुचना केल्या असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगीतले.

** रखडलेल्या पेरण्या घेतील गती
यंदा मृग नक्षत्रापासूनच पाऊस नसल्यामुळे शेतकर्‍यांच्या पेरण्या रखडलेल्या होत्या. दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू झाल्यामुळे रखडलेल्या पेरण्या पाऊस उघडताच गती घेणार आहेत. शेतकर्‍यांनी पेरण्यांची तयारी पूर्ण केली आहे.