शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
2
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
3
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
4
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
5
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
6
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
7
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
8
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
9
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
10
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
11
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
12
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
13
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
14
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
15
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
16
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
17
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
18
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
19
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
20
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

लाेकप्रतिनिधींच्या भांडणात पदाधिकारी, कार्यकर्ते संभ्रमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:46 IST

नंदकिशोर नारे वाशिम : जिल्ह्यात भाजपा व शिवसेना लाेकप्रतिनिधींमधील भ्रष्टाचाराचे आराेप-प्रत्याराेप, भांडण, घाेटाळ्यांच्या आराेपांमुळे दाेन्ही पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते ...

नंदकिशोर नारे

वाशिम : जिल्ह्यात भाजपा व शिवसेना लाेकप्रतिनिधींमधील भ्रष्टाचाराचे आराेप-प्रत्याराेप, भांडण, घाेटाळ्यांच्या आराेपांमुळे दाेन्ही पक्षांतील पदाधिकारी व कार्यकर्ते संभ्रमात पडले आहेत. खरे, खाेटे काय याची चर्चा रंगत असून खरेच आपल्या नेत्याने घाेटाळा केला असेल का? अशी चर्चा हाेतांना दिसून येत आहे. असे असले तरी आपलाच नेता पारदर्शक असल्याचा दावाही करण्यात येत आहे.

वाशिम जिल्ह्यात बाेटावर माेजण्याइतपत लाेकप्रतिनिधी आहेत. त्यातही विकासाची जाण व विकास करण्याची क्षमता असलेल्याच लाेकप्रतिनिधींमध्ये आराेप-प्रत्याराेप हाेत असल्याने जिल्ह्याच्या विकासाचे काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. खासदार भावना गवळी यांनी १०० काेटी रुपयांचा घाेटाळा केल्याचा आराेप भाजपा नेते किरीट साेमय्या यांनी केला. यासंदर्भात पत्रकार परिषद भाजपाच्या कार्यालयात घेण्यात आली. यावेळी आमदार राजेंद्र पाटणी उपस्थित असल्याने हे सर्व कटकारस्थान पाटणी यांचे असल्याचे बाेलले जात आहे. शिवसैनिक तर चक्क आमदार पाटणी यांचेच षड्यंत्र असल्याचे म्हणत आहेत. भावना गवळी यांच्या संस्थांची ईडीकडून चाैकशी सुरू झाली. जिल्ह्यात दाेनदा ईडीचे अधिकारी येऊन गेलेत. तसेच आमदार राजेंद्र पाटणी कुटुंबीयांनी ५०० काेटी रुपयांच्या जमीन खरेदी-विक्रीमध्ये घाेटाळा केल्याचा आराेप खासदार भावना गवळी यांनी केला. अनेकांच्या जमिनी बळकावल्या. त्यांची सुध्दा चाैकशीची मागणी त्यांनी केली. यामुळे दाेन्ही पक्षातील कार्यकर्ते संभ्रमात पडले असून आपल्या नेत्यांनी खरेच एवढा माेठा घाेटाळा केला असेल का यावर चर्चा करताना दिसून येत आहेत. काही जण तर विविध घटना सांगून घाेटाळ्याची शक्यता असल्याचेही म्हणत आहेत. यातील एकनिष्ठ कार्यकर्ते विनाकारण काही बडबड करू नका असेही म्हणत आहेत. दाेन्ही पक्षातील नेते आता आपल्याच नेत्यांच्या घाेटाळ्याची चर्चा आपसात करीत आहेत. असे असले तरी चारचाैघांमध्ये वावरताना मात्र हे आमच्या नेत्याबाबत षड्यंत्र असून जनतेसाठी काय केले याचा पाढा वाचतांना दिसून येत आहेत.

जिल्हयात लाेकप्रतिनिधीमध्ये सुरु झालेल्या आराेप प्रत्याराेपाने मात्र चांगलेच राजकीय वातावरण तापले तापलेले दिसून येत आहे.

आमदार पाटणींचीही चाैकशी लागल्याची शिवसैनिकांत चर्चा

भाजपा नेते किरीट साेमय्या यांनी खासदार भावना गवळी यांनी ५०० काेटीच्या घाेटाळयाच्या आराेपानंतर इडीकडून चाैकशी सुरु झाली. आता काही शिवसेैनिक भावनाताई यांनी आमदार राजेंद्र पाटणी कुटुंबियासंदर्भात ५०० काेटी रुपयांची चाैकशी सुरु असल्याची चर्चा करताना दिसून येत आहेत.

इडीच्या चाैकशी पुढे सर्व पुढे येणार असल्याची भाजपा कार्यकर्त्यांत चर्चा

खासदार भावना गवळी यांच्या संस्थांची ईडीकडून चाैकशी सुरु झाल्याने भाजपा कार्यकर्ते जाेमात दिसून येत आहेत. ईडी काेणालाही साेडत नाही, आता चाैकशीत सर्व घबाड बाहेर येणार असल्याची चर्चा करताना दिसून येत आहेत. इडीचे अधिकारी आता कधीही जिल्हयात येऊन चाैकशी करणार असल्याचेही बाेलत आहेत.